jewellery stolen Google
गोवा

Ponda Crime: 'दागिने घालून फिरू नका, काढून पिशवीत ठेवा आणि घरी जा...', फोड्यांत महिलेला असा घातला गंडा

Goa Latest News: अशा प्रकारे महिलांना फसवणारी टोळी असल्याचा संशय असून दागिने काढून घेण्याचे प्रकार चालले असल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: ढवळी - फोंडा येथे मुख्य रस्त्यावर एका महिलेचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करून पळवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे दागिने पळवले असून फोंडा पोलिसांत या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.

ही घटना आज (मंगळवारी) संध्याकाळी चारच्या सुमारास घडली. ढवळी येथीलच ही महिला रस्त्याने चालत जात असताना दोघेजण दुचाकीवरून तिच्याजवळ आले आणि आपण पोलिस आहोत, सध्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे हे दागिने घालून फिरू नका, काढून पिशवीत ठेवा आणि घरी जा, असे सांगून या भामट्यांनी त्या महिलेला दागिने काढायला लावले व एका कागदात गुंडाळून परत या महिलेकडे दिले. या दागिन्यात सोनसाखळी, तसेच हातातील बांगड्यांचा समावेश होता.

ते दोन्ही भामटे पसार झाल्यानंतर या महिलेने कागद उघडून पाहिला असता त्यात दगड असल्याचे पाहिल्यावर आपण फसलो गेल्याचे तिच्या लक्षात आले. विमनस्कअवस्थेत ही महिला तेथेच रस्त्याच्या कडेला बसून होती. त्यानंतर या महिलेचे नातेवाईक आले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

फसवणारी टोळी?

पंचसदस्य तसेच इतरांनी त्या बाईला धीर दिला आणि पोलिस त्या दोन्ही चोरट्यांना शोधतील, असे सांगितल्यावर ही महिला घरी परतली. फोंडा पोलिस त्या चोरट्यांच्या शोधात सध्या आहेत. राज्यात अशा प्रकारे महिलांना फसवणारी टोळी वावरत असल्याचा संशय असून महिलांना संमोहित करून त्यांच्याकडून दागिने काढून घेण्याचे प्रकार चालले असल्याचा आरोप ढवळीतील महिलांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT