Jennifer Monserrate Election Campaign Dainik Gomantak
गोवा

ताळगावात जेनिफर मोन्सेरात यांचा प्रचार सुरु

पुन्हा संधी दिल्यास संपूर्ण विकास घडवण्याचे जेनिफर यांचे मतदारांना आश्वासन

दैनिक गोमन्तक

पणजी : ताळगाव मतदारसंघाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार जेनिफर मोंसरात यांनी घरोघरी संपर्क मोहीम राबवली. शंकरवाडी आणि परिसरात त्यांनी आज प्रचार केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पंचायत सदस्या अंजली नाईक, उपसरपंच रेगा पै, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (Jennifer Monserrate Election Campaign News Updates)

जेनिफर (Jennifer Monserrate) यांनी प्रचारादरम्यान लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी आपल्याला पुन्हा संधी दिल्यास मतदारसंघाचा संपूर्ण विकास घडवून आणू, असे आश्वासन लोकांना दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, पंचायत पातळीवरून मी राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी समाजकारण सुरूच होते. पण लोकांच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) लढवली आणि लोकांनी मला जिंकून दिले. गेल्या 10 वर्षात राज्य सरकारने राज्याचा सर्वांगीण विकास साधला आहे. माझ्या मतदरसंघातही मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प राबवले. माझे काम लोकांच्या नजरेसमोर माझे काम आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शंकरवाडी आणि परिसरातील लोकांनी जेनिफर यांचे हसतमुखाने स्वागत केले. आपले मत भाजपाला आणि भाजपाच्या (BJP) विकासाला, असल्याचे अनेक लोकांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांची विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारने सर्व सामन्यासाठी अनेक योजना राबविल्या. कोरोना महामारीच्या संकट काळात सरकारने विविध माध्यमातून लोकांना दिलासा दिला. आरोग्य सुविधांत मोठ्या प्रमाणात वाढ केली. काळ कठीण असूनही कोणतीही योजना बंद केली नाही. हे सर्व गोमंतकीय जनतेला चांगलेच माहीत आहे. यामुळे पारदर्शक कारभारासाठी लोक भाजपाला निवडून देतील, असा विश्वास जेनिफर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT