Janita Pandurang Madkaikar  Dainik Gomantak
गोवा

जनिता पांडुरंग मडकईकर यांचा सरपंचपदाचा राजीनामा

पक्षाच्या नेत्यांनीच विरोध केल्याची प्रतिक्रिया त्यांनी निकालानंतर केली होती व्यक्त

Sumit Tambekar

पणजी: भाजपतर्फे कुंभारजुवेतून विधानसभा निवडणूक लढविलेल्या व माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जनिता पांडुरंग मडकईकर यांनी जुने गोवे सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे. निवडणूक झाल्यापासून पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत त्या नाराज होत्या. निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच विरोधात काम केल्याची प्रतिक्रिया त्यांनी निकालानंतर व्यक्त केली होती. (Janita Pandurang Madkaikar resigns as Sarpanch )

जुने गोवे पंचायत क्षेत्रात पुरातन स्थळ असलेल्या भागात नियमांचे उल्लंघन करून नुतनीकरणाच्या नावाखाली नव्याने बांधकाम करण्यात आल्याने ही पंचायत प्रकाशझोतात आली होती. स्थानिकांनी त्याला विरोध करून आंदोलन केल्याने पंचायत अडचणीत आली होती व तेव्हापासून सरपंच जनिता मडकईकर दबावाखाली होत्या. त्यांच्याकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात होती.

हे बांधकाम भाजपशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीचे असल्याने सरकारकडूनही त्याची दखल घेतली गेली नव्हती. जुने गोवे पंचायत क्षेत्रामध्ये विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य व अध्यक्ष सिद्धेश नाईक हे हस्तक्षेप करत असल्याने जनिता मडकईकर यांनी पक्षाकडे तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने त्या नाराज होत्या.

विनयभंगप्रकरणी संशयित तन्वीर अहमदला अटक

दोन अल्पवयीन मुलींना कोंडून त्यांचा विनयभंग करणाऱ्या संशयित तन्वीर अहमद याला आज पणजी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. पणजी पोलिसांनी त्याला काल अटक केली होती. त्याची पार्श्‍वभूमी तपासण्याबरोबरच या प्रकरणातील सखोल चौकशीसाठी त्याची कोठडीची आवश्‍यकता पोलिसांनी अर्जात मांडली होती. संशयित तन्वीर अहमद याने त्याच्या चिकन दुकानात दोन अल्पवयीन मुलींना खाद्यपदार्थ देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले. या मुली दुकानात आल्या असता त्याने मुलींचा विनयभंग केला. या घटनेनंतर त्या घरी आल्यावर आईला माहिती दिली. लगेच त्या संशयिताला जाब विचारण्यात आला असता त्याने उडावी उडवीची उत्तरे दिली. तेथील काही दुकानधारकांनी तसेच लोकांनी त्याला बेदम चोप दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT