AAP Dainik Gomantak
गोवा

बाणावलीत भरवणार जनता दरबार

आमदार वेन्झी व्हिएगस: समर्थक, कार्यकर्त्यांची रॅली

दैनिक गोमन्तक

सासष्टी: बाणावलीच्या लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आपण संपूर्ण मतदारसंघात जनता दरबारांचे आयोजन करणार आहे,असे बाणावलीचे आप पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले. निवडून आल्याबद्दल त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते.विधानसभेत आप पक्ष हा लोकांचा आवाज म्हणून काम करणार असल्याचेही व्हिएगस यांनी सांगितले.

आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात युवकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. व त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाईल, असेही व्हिएगस यांनी सांगितले. त्याच्या समवेत आप पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य हेन्झेल फर्नांडिस उपस्थित होते. सर्वप्रथम बाणावली मतदार संघातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग भरवले जातील. हे विद्यार्थी आता अंतिम परीक्षा देणार आहेत. त्यामुळे या वर्गांचा त्यांना फायदाच होईल, असेही आमदार व्हिएगस यांनी सांगितले.

पावसाळ्या पूर्वीची सर्व दुरुस्तीची कामे लवकरच हातात घेतली जातील. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातील, असेही आमदार वेन्झी व्हिएगस यांनी पत्रकारांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT