Janardhan Bhandari criticizes Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

'निलेश काब्राल खोटं बोलून काणकोण वासीयांची थट्टा करतायत'

मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे लोकप्रतिनिधींना शोभत नाही; जनार्दन भंडारी

दैनिक गोमन्तक

काणकोण : सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल मडगाव-काणकोण रस्त्यावर खड्डे नसल्याचे धांदात खोटे बोलून काणकोण वासीयांची थट्टा उडवीत आहेत, आसा आरोप कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी केला आहे. हल्लीच मडगाव ते काणकोण पर्यतच्या हमरस्त्याची सार्वजनिक मंत्र्यांनी अभियंत्यासमवेत पहाणी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री मडगाव (Margao)-काणकोण रस्त्यावर खड्डे नसल्याचे धांदात खोटे बोलून काणकोण वासीयांची थट्टा उडवीत आहेत.

मात्र पहाणी करूनही ते सत्य लपवून काणकोण वासियांना महामार्गावर खड्डे पडले नसून फक्त डांबराचा थर गेला असल्याचे वक्तव्य करून काणकोण वासीयांच्या दुखावर डागण्या देत असल्याचे भंडारी यांनी सांगितले. त्यासाठी आज खास टीम सहीत महामार्गावर पडलेल्या खड्ड्याचे व्हिडिओ (Video) व फोटो काढले आहेत. ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना देऊन त्यांनी किती सत्य व किती असत्य वक्तव्य केले याचा पुरावा निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांना देण्यात येणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले. गेले वर्षभर काणकोण (Canacona) वासीयांनी या खड्डे पडलेल्या रस्त्यावरून प्रवास करून वाहना बरोबरच आपल्या शरिराला इजा करून घेतली आहे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे लोकप्रतिनिधींना शोभत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT