J P Nadda to visit Goa tomorrow

 
Dainik Gomantak
गोवा

जे. पी. नड्डा उद्या गोवा दौऱ्यावर

पंतप्रधानांचा संदेश : प्रगतीसाठी स्थैर्याची गरज; मुख्यमंत्र्यांची थोपटली पाठ

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) हे 21 व 22 डिसेंबरला दोन दिवसांच्या गोवा (Goa) दौऱ्यावर येत आहेत. 21 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता ते केपे येथे जाहीर सभेत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत व 22 रोजी ते उत्तर गोवा दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात राज्यातील निवडणुकीसंदर्भातचाही (Goa Election) आढावा घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात पक्षाचे अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

गोव्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यानंतर आता राज्यातील कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अध्यक्ष नड्डा हे पक्षाच्या विविध समितींच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेणार आहेत. हल्लीच गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे गोव्यात येऊन गेले. निवडणूक जाहीरनामा समिती तसेच निवडणूक व्यवस्थापन समितीच्या त्यांनी बैठका घेतल्या होत्या तसेच पदाधिकाऱ्यांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या.

दरम्यान, भाजपने राज्यात कोणत्याही परिस्थिती पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मतदारसंघामध्ये लोकांचा अधिक पाठिंबा असलेल्या उमेदवारांना भाजपमध्ये ओढण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत त्यांच्या गळाला जयेश साळगावकर, रोहन खंवटे व रवी नाईक हे तिघे लागले आहेत. मगोच्या निश्‍चित उमेदवारांनाही त्यांनी गळ घालण्यास सुरवात केली आहे. त्यातील एक राजी झाला आहे, तर पेडण्यात तूर्त भाजपला यश आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT