Goa University
Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa Education: उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावेल

दैनिक गोमन्तक

Goa Education: विद्या समीक्षा केंद्रामार्फत केजी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता उच्च शिक्षणासाठी दिल्ली विद्यापीठातील समर्थ गव्हर्नर मॉड्युल राज्यात राबवण्यात येणार असून यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी (ता.२७) व्यक्त केली.

समर्थ ई-गव्हर्नन्स अंमलबजावणीसाठी गोवा आणि दिल्ली विद्यापीठांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, अन्वेषक समर्थ प्रकल्प प्रमुख प्रा. संजीव सिंग, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, प्रकल्प आणि तंत्रज्ञान प्रमुख शरद मिश्रा, समर्थ ई-गव्हर्नन्सचे नोडल अधिकारी डॉ. महादेव गवस आणि राज्यातील शिक्षण संस्थांचे प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, दिल्ली विद्यापीठ आणि गोवा सरकार, ‘समर्थ’च्या अंमलबजावणीसाठी एकत्र येत आहेत. ‘समर्थ’ हा शिक्षण मंत्रालयाच्या माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणावर राष्ट्रीय मिशन अंतर्गत एक उपक्रम आहे. दिल्ली विद्यापीठातील ‘आयआयसी’द्वारे डिझाइन आणि विकसित केलेल्या या मॉड्युलमध्ये शिक्षणाच्या प्रगतीची मोठी क्षमता आहे. याचा गोव्याच्या उच्च शिक्षणासाठी फायदा होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आदिती बर्वे यांनी केले.

काय आहे समर्थ मॉड्युल?

  • सर्व शिक्षण संस्था एकसमान युनिफाइड पोर्टलवर ऑनलाइन प्रवेश अर्ज देऊ शकतात, जे विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होते. प्रत्येक महाविद्यालय किंवा विद्यापीठासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही.

  • ही एक सर्वसमावेशक प्रणाली आहे, जी शैक्षणिक संस्थांना त्यांचे शैक्षणिक कार्यक्रम आणि अभ्यासक्रमांचे प्रभावीपणे आयोजन, नियोजन आणि देखरेख करण्यात मदत करते.

  • समर्थ संस्थांमधील शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्सचे सुरक्षित हस्तांतरण सुलभ करते, याची खात्री करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी ओळखली जाते आणि त्यांची सातत्यपूर्ण गणना होते.

  • ‘समर्थ’ सर्व सरकारी प्रायोजित शिष्यवृत्ती वितरण एका समान पोर्टलद्वारे स्वयंचलित करेल, शिष्यवृत्ती अर्ज आणि पुरस्कार प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करेल, विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्ती स्थितीचा मागोवा घेणे सोपे होईल.

  • ‘समर्थ’ शैक्षणिक संस्थांमधील परीक्षा प्रक्रियेच्या विविध पैलूंना सुव्यवस्थित आणि डिजिटल करण्यासाठी डिझाइन केलेले सर्वसमावेशक परीक्षा मॉड्युल आहे.

  • ‘समर्थ’मधील फायनान्स मॉड्युल हे शैक्षणिक संस्थांचे आर्थिक कामकाज आणि व्यवहार कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे व्यवस्थापित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

  • हे मॉड्युल शैक्षणिक संस्थांमधील एचआर कार्यांचे विविध पैलू जसे की लिव्ह मॅनेजमेंट आणि पेरोल मॅनेजमेंट, जॉब प्रमोशन कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी डिझाइन केले आहे.

समर्थ मॉड्युल कोणासाठी?

समर्थ ई-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म तंत्रज्ञान आणि शिक्षण प्रणालीला एकत्रित करते. हे देशभरातील उच्च शिक्षण संस्था, विद्यार्थी, कर्मचारी आणि इतर भागधारकांच्या सेवांचे नियोजन, व्यवस्थापन, वितरण आणि देखरेख यासाठीचे डिजिटल फ्रेमवर्क आहे. हे उच्च शिक्षण संस्थांसाठी ४० हून अधिक मॉड्युल्सचे स्पेक्ट्रम प्रदान करते, ज्यामध्ये अनेक प्रमुख आणि फायदेशीर मॉड्युल आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT