Indore Double Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: जावयानेच केला घातपात; शिवानीच्‍या वडिलांचा आरोप

Goa Crime News: वास्‍को दुहेरी मृत्‍युप्रकरणी पती अनुरागवर संशयाची सुई

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: नवेवाडे-वास्‍को येथे गॅस स्‍फोटात शिवानी राजावत आणि तिची आई जयदेवी चौहान यांचा झालेला मृत्यू हा घातपाताचा प्रकार असल्‍याचा आरोप शिवानीच्‍या माहेरच्‍या लोकांनी केल्‍याने या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.

या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाचा तपास करणारे मुरगावचे उपजिल्‍हाधिकारी भगवंत करमली यांनी 7 डिसेंबर राेजी शिवानीचा भाऊ शुभमसिंह आणि वडील दिलीपसिंह चौहान यांना त्‍यांच्‍या जबान्‍या नोंदवून घेण्‍यासाठी बोलावले आहे.

या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत शिवानीचा मृतदेह अंत्‍यसंस्‍कारासाठी तिच्‍या पतीच्‍या ताब्‍यात देऊ नये, अशी मागणी शुभमसिंह याने तपास यंत्रणेकडे केली आहे.

शिवानीचा पती अनुराग आणि सासूकडून हुंड्यासाठी छळ होत होता. त्‍यातूनच हा घातपाताचा प्रकार घडवून शिवानी आणि जयदेवी यांचा अनुरागकडून खून करण्‍यात आला, असा आरोप दिलीपसिंह चौहान यांनी केला आहे. या दोघांवरही खुनाचा गुन्‍हा नोंद करून हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवेवाडेत 18 नोव्‍हेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. शिवानीचा पती अनुराग हा नौदलात लान्‍स नायक या पदावर काम करत आहे. चाैकशी सुरू असल्‍यामुळे नाैदलाने त्‍याला गोवा सोडून अन्‍य कुठेही जाऊ नये, अशा सूचना केल्‍या आहेत. ही दुर्घटना घडली, त्‍यावेळी घरात शिवानी आणि तिची आई जयदेवी या दोघीच होत्‍या.

तिचा पती अनुराग हा बाहेर बाजारात गेल्‍याचे सांगितले जाते, तर सासू जवळच्‍या मंदिरात गेली हाेती. शिवानीच्‍या आईने दूध तापविण्‍यासाठी लाईटर सुरू केल्‍यावर गॅसचा भडका उडून ती भाजली. तिला वाचविण्‍यासाठी शिवानी आली, त्‍यावेळी तीही होरपळली. हा गॅस नेमका कुणी सुरू ठेवला होता, याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले असून शिवानीच्‍या पतीने मुद्दाम गॅस ऑन ठेवला असावा, असा आरोप तिच्‍या माहेरच्‍या लोकांकडून केला जात आहे.

...तर मग सिलिंडर कसे फुटले नाही?

शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्‍यू गॅस सिलिंडर स्‍फोटामध्‍ये झाला, असा दावा तिच्‍या पतीकडून करण्‍यात येत असला तरी हा गॅस सिलिंडर स्‍फोट होता, तर सिलिंडर कसे फुटले नाही? हा प्रश्‍न उभा राहात आहे. फॉरेन्‍सिक विभागाने केलेल्‍या प्राथमिक चौकशीत गॅसची शेगडी उघडी ठेवल्‍याने गॅसचा एक थर निर्माण होऊन या थराने पेट घेतला असावा, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

गॅस व्हॉल्व कुणी सुरू केला? गूढ कायम

गॅस शेगडीची पाहणी केली असता गॅसचा व्हॉल्‍व ऑन असल्‍याचे दिसून आले. हा गॅस व्हॉल्व कुणी सुरू करून ठेवला, याची सखोल चौकशी होण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जाते. सध्‍या संशयाची सुई शिवानीचा पती अनुराग याच्‍याकडेच जात आहे. शिवाय नेमके त्‍याचवेळी अनुरागची आई घराबाहेर कशी पडली, असेही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT