Mayem Malyachi jatra Dainik Gomantak
गोवा

Mayem Malyachi jatra : अखेर ‘माले’ पेटलेच नाही; देवीचा ‘पण’ अपूर्ण

मयेत केळबाईचे मंदिर बंदच

दैनिक गोमन्तक डिजिटल

महाजनकीच्या वादात अडकलेल्या मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानच्या धाकट्या अर्थातच माल्याच्या जत्रेतील ‘माले’ यंदाही पेटलेच नाही. माले पेटले नसल्याने समस्त भाविकांची निराशा तर झालीच, उलट पेटते ‘माले’ डोक्यावर घेऊन नाचण्याचा केळबाई देवीचा ‘पण’ही अपूर्ण राहिला.

बहीण असलेल्या मुळगावच्या देवीला निरोपही देता आला नाही. ‘माले’ पेटले नसले, तरी पारंपरिक रितीरिवाज केल्यानंतर मुळगाव येथील देवीची पेठेने (गुरुवारी) पहाटे मुळगावात प्रस्थान केले. परंपरेप्रमाणे मुळगावची पेठ तीन दिवस मये गावात होती.

सोमवारी (ता.27) मुळगाव येथील देवीची पेठ मये गावात आली होती. मात्र, यंदा केळबाई देवीची पेठ मंदिरातच बंदिस्त राहिली. जत्रेच्या दिवसापर्यंत तीन दिवस मंदिर बंदच होते. त्यामुळे जत्रेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यातच (बुधवारी) मये गावातील वाद चिघळल्याने मयेतील माल्याची जत्रा साजरी होण्याची शक्यताही मावळली होती. तरीदेखील काही भाविकांना चमत्काराची अपेक्षा होती.

मुळगावची पेठ गावात

परंपरेप्रमाणे काल मध्यरात्री मुळगाव येथील देवस्थानचे चौगुले आणि धोंड भक्तगण वाजतगाजत मयेत आले. मात्र, श्री माया केळबाई देवस्थानची तरंगे आणि माले चव्हाट्यावर आले नाही.

वायंगिणी येथील चौगुले आणि धोंड भक्तगण येताच, पारंपरिक रितीरिवाज करण्यात आले. नंतर पेठ बंद करून फुलांनी सजविण्यात आली. गाऱ्हाणे घातल्यानंतर पहाटे 4 वाजता अवसारी मोडासहित पेठेचे मुळगावच्या दिशेने प्रयाण झाले.

अजूनही मंदिर बंदच

श्री केळबाई देवीचे मंदिर अजूनही बंद आहे. गेल्या सोमवारी पहाटेपासून या मंदिराचा मुख्य दरवाजा उघडण्यात आलेला नाही. (गुरुवारी) सायंकाळी उशिरापर्यंत मंदिर बंदच होते. मंदिर बंद असल्याने त्यातच सहाजणांना अटक केल्याने नाईक गावकर गटातील लोक नाराज आहेत. महिलांसह या गटातील लोकांनी मंदिरातच ठाण मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT