local Fishermen Dainik Gomantak
गोवा

'गोव्यातील स्थानिक मच्छिमारांचे प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात मांडणार'

मायकल डिसोझा: सीझेडएमपी आराखड्यास शापोरात तीव्र विरोध

दैनिक गोमन्तक

शिवोली: केवळ मार्मगोवा पोर्ट ट्रस्टचा फायदा डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारच्या सहयोगाने केंद्र सरकारकडून अंबलबजावणीसाठी तयार ठेवण्यात असलेल्या नवीन सीझेडएमपी आराखड्यास शापोरात जोरदार विरोध दर्शविण्यात आला.

स्थानिक मच्छीमार बांधवांचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा प्रश्न निर्माण करणारा हा विषय वेळ आल्यास संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीसमोर मांडण्यात येणार असल्याचा गर्भित इशारा जैव संवर्धन समितीचे चेअरमन मायकल डिसोझा यांनी सरकारला दिला आहे.

आज (रविवारी) सकाळी शापोरा जेटीवर झालेल्या विशेष बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत डिसौझा बोलत होते. यावेळी माहिती हक्क कायद्याचे कार्यकर्ते राजन घाटे, शिवोली कॉंग्रेसच्या गटाध्यक्ष पार्वती नागवेंकर, बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ गावकर, शापोरा फिशींग बोट असोसिएशनचे चेअरमन बलभीम मालवणकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान हरमलकर, स्थानिक मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रातील भाजपा सरकार गोव्यातील स्थानिक लोकांचे अस्तित्व नष्ट करून दिल्लीतील अदाणी - अंबानी यांच्यासाठी गोव्याचे रुपांतर कोळसा हबमध्ये तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप राजन घाटे यांनी केला.

बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी भाजपचे दिवस भरलेले आहेत. त्यामुळे पराजित पक्षांनी यापुढे स्थानिक लोकांच्या भावनांशी खेळ न खेळण्याचा भाजपला सल्ला दिला. यावेळी शापोरा फिशींग बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर, सामाजिक कार्यकर्त्या पार्वती नागवेकर यांनी सीझेडएमपी विरोधात लढा तीव्र करण्यासंबंधात लोकांना आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT