Margao municipal council Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'मॉडेल मडगाव पोर्टल' पालिकेचे अधिकृत पोर्टल आहे का? अमित पाटकर यांचा सवाल

Margao Municipal Council: नागरिकांची अशाप्रकारे केली जाणारी सतावणूक बंद करा अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

मडगावच्या सर्वसामान्य जनतेच्या छोट्या छोट्या कामांसाठीच्या अर्जांवर ‘मॉडेल मडगाव पोर्टल’वरून अर्ज न आल्यास ‘गॉडमन’ दिगंबर कामत यांच्या आदेशावरून सरकारी अधिकाऱ्यांकडून मडगावच्या रहिवाशांची सतावणूक होणे धक्कादायक आहे.

मॉडेल मडगाव पोर्टल हे मडगाव पालिकेचे अधिकृत पोर्टल आहे का, असा सवाल काँग्रेस अध्‍यक्ष अमित पाटकर यांनी केला असून नागरिकांची ही अशाप्रकारे केली जाणारी सतावणूक बंद करा, अशी मागणी केली आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी त्वरित हस्तक्षेप करून हा प्रकार बंद करावा, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

मडगावच्या नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. मडगावकरांनी निर्भिड रहावे. काँग्रेस पक्ष त्यांच्या हक्कांसाठी लढणार आहे. सामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही लवकरच एक विभाग सुरू करू. काँग्रेसचे तिन्ही आमदार आता पूर्ण क्षमतेने काम करतील, असे पाटकर म्हणाले.

मामलेदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील तलाठी तसेच मडगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर जन्म दाखले, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, भिन्नता प्रमाणपत्र आदींच्या अर्जांवर प्रक्रिया करू नये, यासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी आहेत.

आमदारांनी घाणेरडे खेळ बंद करावेत!

जे अर्ज ‘मडगाव मॉडेल’ ईमेल आयडीवरून अपलोड केले जात नाहीत, ते अर्ज तसेच ठेवावेत असे निर्देश फोन करून स्थानिक आमदार सरकारी अधिकाऱ्यांना देत असल्याचा प्रकार धक्कादायक आहे, असा दावा त्‍यांनी केला. याचे माझ्‍याकडे पुरावे आहेत, असेही पाटकर यांनी म्‍हटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे मडगावच्या गद्दार आणि पक्षांतर करणाऱ्या आमदाराने हे कृत्य केले आहे.

मडगावकरांनी काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या पाठीशी उभे राहून पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवला. आतातरी दिगंबर कामत यांनी पराभवातून धडा घेऊन घाणेरडे खेळ खेळणे बंद केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

SCROLL FOR NEXT