Manohar International Airport Goa Dainik Gomantak
गोवा

एक अफवा गावभर झाली! मोपा विमानतळावरील भूताटकीची हॉरर स्टोरी तूफान व्हायरल Video

Manohar International Airport Goa: मोपा विमानतळावर भूताटकी असल्याचा दावा करणारे तथ्यहिन व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Pramod Yadav

Manohar International Airport Goa

पेडणे: दीड वर्षापूर्वी उत्तर गोव्यात उभारण्यात आलेल्या मोपा विमानतळावरुन विविध वाद सुरु आहेत. त्यात विमानतळावर भूताटकी असल्याच्या वादाने भर घातली आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी अधिवेशनादरम्यान उपमर्दाने केलेल्या विधानातून निर्माण झालेली स्टोरी आता हॉरर स्टोरीत रुपांतरीत झाली असून, सोशल मिडियावर ती तूफान व्हायरल होत आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूताटकी असल्याचा गैरसमजातून निर्माण झालेला वाद जुना आहे. यात पावसाळी अधिवेशनादरम्यान मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि त्यानंतर आमदार विजय सरदेसाईंनी केलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या विधानावरुन अधिक भर पडली आहे.

रात्री दहानंतर मोपा विमानतळावर गोमंतकीय कर्मचारी दिसत नाहीत. परप्रांतीय कर्मचारी असतात पण, गोमंतकीय कर्मचारी थांबत नाहीत, असे आमदार जीत आरोलकर अधिवेशनादरम्यान म्हणाले होते.

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत. याच मुद्यावरुन भाष्य करताना रात्रीच्या वेळेस गोमंतकीय कर्मचारी का काम करत नाहीत याचा तपास करायला हवा. काय भूताटकी वैगरे आहे का? हे तपासायला हवं, असे आमदार सरदेसाई म्हणाले.

उपमर्दाने केलेल्या या विधानावरुन सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोपा विमानतळ हॉरर विमानतळ असल्याचा दावा केला आहे.

तसेच, विमानतळावर अनेक अनपेक्षित घटना घडतात असा दावा फुकरान ईबानी याने या व्हिडिओद्वारे केला आहे. विमानतळावरील कर्मचारी ते विमानातील पायलट्सना देखील अशा घटनांचा सामना करावा लागल्याचे व्हिडिओत म्हटले आहे.

दरम्यान, या व्हिडिओत करण्यात आलेल्या दाव्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अथवा पुरावा व्हिडिओ प्रसिद्ध करणाऱ्या फुकरान ईबानीने दिलेला नाही.

विनाधार अनेक कथा व्हायरल

मोपावर भूताटकी असल्याचा दावा करणाऱ्या अनेक विनाधार कथा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. अशाच एका घटनेची कथा मोपावरील टॅक्सी चालकासोबत घडल्याचे सांगितले जाते.

टॅक्सी चालक एका प्रवाशाला घेऊन विमानतळावर गेला खरा पण तिथे गेल्यावर टॅक्सीतून प्रवासी गायब झाल्याचा दावा या कथेत करण्यात आला आहे. अशाप्रकारच्या खोट्या घटनांमुळे मोपा प्रसिद्धी हॉरर एअरपोर्ट होत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बदनामीचे षडयंत्र

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूताटकी असल्याच्या चुकीच्या कथा, कहाण्या समाज माध्यमांवर पसरविल्या जात आहेत. यातून स्थानिक नागरिक, विमानतळावरील कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात घबराहट पसरत आहे. अशाप्रकारच्या चुकीच्या माहितीतून विमानतळाच्या बदनामीचे षडयंत्र केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT