Water Tap Canva
गोवा

Veling News: बाहेर धो-धो पाऊस पण घरात पाण्याचा ठणठणाट!

Water Problem In Goa: गोठण-वेलिंग भागात अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मागच्या काही दिवसांपासून येथील नागरिकांना सतावत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

बाहेर धो-धो पाऊस कोसळतोय; पण घरात पिण्यासाठी पाणी नाही, अशी विचित्र स्थिती प्रियोळ मतदारसंघातील गोठण-वेलिंग भागातील नागरिकांची झाली आहे. या भागात मागच्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत होता; पण आज (शनिवारी) दिवसभर नळाला पाणीच नसल्याने पावसाचे पाणी प्यायचे काय, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.

गोठण-वेलिंग भागात अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मागच्या काही दिवसांपासून येथील नागरिकांना सतावत आहे. दिवसातून काही वेळ पाणी येते आणि नंतर गायब होते, अशी येथील स्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी नळाला पाणीच नसल्याने लोकांनी कसेबसे निभावून नेले. मात्र आज (शनिवारी) पुन्हा तोच प्रकार झाल्याने लोकांनी या पाणी टंचाईविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सकाळपासून नळाला पाणीच नसल्याने लोकांची धावपळ उडाली आहे. इतर कामासाठी सोडाच; पण पिण्यासाठी पाणी नसल्याने हे पाणी आणायचे कुठून, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. बाहेर धो-धो पाऊस कोसळत असताना नळाला पाणीच नसल्याच्या प्रतिक्रिया येथील गृहिणींनी दिल्या.

ओहोळातून जलवाहिनी

या भागातील जलवाहिनी ओहोळातून नेल्यामुळे ती फुटली की दुरुस्तीसाठी मोठे प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळे नळाला पाणी येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने याप्रकरणी त्वरित लक्ष घालून येथील लोकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी हे दुरुस्तीकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT