Adv. Aires Rodrigues Dainik Gomantak
गोवा

Aires Rodrigues: माजी मंत्र्यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणात महिलेच्या बदनामीप्रकरणी आयरीश रॉड्रिग्ज दोषी

सव्वा दोन वर्षे तुरूंगवासासह 10 दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली, पण शिक्षेला सहा महिने स्थगिती

Akshay Nirmale

Aires Rodrigues: गोव्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रिग्ज यांना म्हापसा न्यायालयाने माजी मंत्र्यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणात महिलेची बदनामी केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. सोशल मीडियावरून संबंधित महिलेची बदनामी केल्याचा आरोप अॅड. रॉड्रिग्ज यांच्यावर होता. न्यायालयाने त्यांना 2 वर्षे आणि 3 महिन्यांचा तुरूंगवास आणि 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, या शिक्षेला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून तोपर्यंत या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

हे सेक्स स्कँडल प्रकरण 2017 चे असून ते तत्कालीन जलस्त्रोत मंत्र्यांशी संबंधित होते. रॉड्रिग्ज यांनी संबंधित महिलेचे विविध फोटोज व्हॉट्सअॅप, फेसबूकवरून शेअर केले होते. त्यानंतर हे फोटोग्राफ्स विविध सोशल मीडिया ग्रुपमधून व्हायरल झाले होते. अंजुना पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर २०१८ मध्ये रॉड्रिग्ज यांची चौकशी झाली होती. न्यायालयाने या प्रकरणात १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. विविध कलमांखाली मिळून रॉड्रिग्ज यांना न्यायालयाने एकुण 2 वर्षे 3 महिने तुरूंगवास आणि 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी म्हापसा न्यायालयाच्या या निर्णयाला पुढील आठवड्यात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्री विनोद पालीनकर यांच्या बाबतचे हे कथित सेक्स स्कँडल प्रकरण आहे. विशेष म्हणजे, यात विनोद पालिनेकर यांचा जबाब घेतलेला नाही. किंवा त्यांचा या खटल्यात साक्षीदार म्हणून उल्लेख करण्यात आला नाही, असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT