Goa Tour
Goa Tour Dainik Gomantak
गोवा

Goa Tour: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...', IRCTC ने आणले खास पॅकेज

दैनिक गोमन्तक

IRCTC Goa Tour Package: भारतातील अद्भुत समुद्रकिनाऱ्यांचा विचार केल्यास गोव्यातील बीच आघाडीवर येतात. गोवा हे आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि मौजमजेसाठी ओळखले जाते. म्हणून दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. (irctc goa delights ex raipur package ex raipur package starting 24 660 rupees)

दरम्यान, तुम्हीही गोव्याला (Goa) भेट देण्याचा विचार करत असाल, तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने तुमच्यासाठी खास टूर (IRCTC Tour Package) आणली आहे. चला तर मग जाणून घेऊया या टूर पॅकेजबद्दल...

तसेच, आयआरसीटीसीने (IRCTC) विशेष टूर पॅकेजला 'गोवा डिलाइट्स' असे नाव दिले आहे. या दौऱ्याची सुरुवात छत्तीसगडमधील रायपूर येथून होणार आहे. हे संपूर्ण पॅकेज सात दिवसांचे असणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला गोव्यातील कलंगुट बीच, अंजुना बीच, वागेटोर बीच, फोर्ट अगुआडा आणि दक्षिण गोव्यातील (South Goa) बॅसिलिका ऑफ बॉम जीसस, मांडवी नदी क्रूझ इत्यादीसारख्या अनेक सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. ही टूर 15 ऑगस्ट 2022 पासून सुरु होईल. टूरमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करण्याची संधीही मिळणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही कम्फर्ट क्लासमधून प्रवास कराल.

दुसरीकडे, प्रथम तुम्ही रायपूरहून दिल्लीला (Delhi) याल आणि नंतर दिल्ली ते गोवा फ्लाइटनेच प्रवास कराल. या पॅकेजमध्ये तुम्हाला डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची संधी यासारख्या अनेक सुविधा मिळतील. यासोबतच तुम्हाला रोज नाश्ता आणि रात्रीचे जेवण यामध्ये मिळते. तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी प्रवास विमा काढला जाईल. यासोबतच बुकिंगमध्ये जीएसटीचा देखील समावेश केला जाईल.

शिवाय, या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 29,825 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, दोन लोकांना प्रति व्यक्ती 24,840 रुपये शुल्क द्यावे लागेल. तीन जणांना प्रति व्यक्ती 24,660 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मुलांसाठी तुम्हाला स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. या टूरबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही IRCTC वेबसाइट https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=SCBSA09 ला भेट देऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT