Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: खंडणी की इतर काही? सव्वा वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचे कारण गुलदस्‍त्‍यात

Pernem Police: वेंगुर्लेकर व च्यारी हे दोघेही पोलिस असल्याचे तसेच वर्गमित्रही असल्याचे निष्पन्न झाले

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: सुकाळे-कोरगाव येथे काल घडलेले सव्वा वर्षाच्या मुलाचे अपहरणनाट्य हे वर्गमित्र असलेल्या दोन पोलिसांशी संबंधित आहे. त्‍यामुळे केवळ खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते की या प्रकरणाला आणखीन कोणता कोन आहे, याची माहिती पेडणे पोलिस घेत आहेत.

मुलाचे वडील कमलेश वेंगुर्लेकर हे गोवा सशस्त्र पोलिस दलात कार्यरत आहेत तर या प्रकरणातील मुख्य संशयित निकेश च्यारी हाही याच दलात काम करतो. यामुळे वैयक्तिक वाद की अन्य कोणता कौटुंबिक विषय याला कारणीभूत आहे याची शक्याशक्यता पडताळून पाहण्यात येत आहे.

सुकाळे येथे काल रात्री हा प्रकार घडला होता. व्हरांड्यात सफरचंद खात असलेल्या मुलाला घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय नार्वेकर याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी संशयिताचा साथीदार असलेला मोटारसायकलस्वार पसार झाला होता. संजय नार्वेकरची कोठडीत चौकशी केल्यानंतर निकेश च्यारी याचे नाव समोर आल्याने पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतले. वेंगुर्लेकर व च्यारी हे दोघेही पोलिस असल्याचे आढळून आले. एवढेच नव्हे तर ते वर्गमित्रही असल्याचे निष्पन्न झाले.

गोव्यात पर्यटनासाठी आले होते. त्यांचा एस्कॉर्ट संकेतस्थळावर संशयित महिलांशी संपर्क झाला. हॉटेलच्या खोलीवर गेल्यावर संशयित महिलांनी दोन्ही पर्यटकांना मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास पोलिसांत बलात्कार केल्याची तक्रार करू, अशी धमकी दिली. त्यामुळे दोन्‍ही पर्यटकांनी घाबरून नाईलाजास्तव संशयित महिलांच्या बँक खात्यात २० हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्‍यानंतर संशयित महिला घटनास्थळावरून पसार झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT