IPL Final Bookies From Goa Arrested in Nagpur Dainik Gomantak
गोवा

IPL फायनलवर गोव्यात सट्टा, बुकी विमानातून उतरताच अडकले नागपूर पोलिसांच्या जाळ्यात

बुकींकडून एक लॅपटॉप, तीन मोबाईल, रोख रक्कम आणि तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pramod Yadav

IPL Final Bookies From Goa Arrested in Nagpur: आयपीएलच्या काळात विविध सामन्यांवर सट्टा लावल्याच्या घटना वारंवार समोर येतात. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यावर देखील ऑनलाइन सट्टा लावल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आयपीएल फायनलवर सट्टा लावणाऱ्या दोन बुकींना नागपूर पोलिसांनी विमानतळावर अटक केली. दोघेही गोव्यातून नागपुरात आले होते.

कुमार हरीकुमार सचदेव आणि हेमंत राजकुमार गुरशाग्यानी अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे दोन्ही बुकी गोव्याहून नागपुरात येत होते. नागपूर पोलिसांना याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी विमानतळावर सापळा रचला, दोघेही विमानतळाबाहेर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली.

दोन्ही बुकींना सोनेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, तीन मोबाईल, रोख रक्कम आणि तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान बेकायदेशीर सट्टा आणि बेहिशेबी आर्थिक व्यवहार करून सरकारची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील जुगाराशी संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या बुकींचा हा अवैध धंदा महाराष्ट्रासह राज्याबाहेर पसरला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याबाबतही अधिक तपास केला जात आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू असलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावण्यात गोव्यातील दोन बुकी सहभागी असून ते गोव्याहून नागपुरात येत असल्याची गुप्त माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे विमानतळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT