Online Betting Dainik Gomantak
गोवा

Online Betting: गोव्यात पंजाबविरुद्ध गुजरातच्या आयपीएल सामन्यावर सट्टा; अहमदाबादच्या 9 जणांना अटक

दरम्यान, राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कांदोळीमधून अटक केली.

Manish Jadhav

IPL 2024: आयपीएल 2024 (IPL 2024) च्या 37 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्जने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत सर्व गडी गमावून 142 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्स संघाने 19.1 षटकांत सात गडी गमावून 146 धावा करुन सामना जिंकला.

दरम्यान, या सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीला कांदोळीमधून ताब्यात घेतले. याप्रकरणी अहमदाबाद, गुजरातमधील 9 जणांकडून पोलिसांनी 4 लाखांचा मुद्देमालही जप्त केला. याप्रकरणी कळंगुट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई गोवा पोलिसांच्या उत्तर गोवा जिल्हा इंटेलिजन्स पथकाने कांदोळीमधील क्रेसेंट व्हिलावर छापा टाकला. यावेळी संशयित टोळी ही आयपीएलच्या पंजाब इलेव्हन्स आणि गुजरात टायटन्समधील सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्या व्हिलावर छापा टाकत संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यात तिलोककुमार चेथानी, रॉकी तलेजा, पवनकुमार मगलानी, किशन लवाणी, गोपलानी भारत, दिनेश भाटीया, नरेश गेलवानी, चौथानी रिंकूकुमार व रामचंदानी मनीष या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व संशयित अहमदाबाद-गुजरातमधील आहेत. संशयितांकडून पोलिसांनी 1 लॅपटॉप आणि 17 मोबाईलसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT