Vijay Sardesai News Dainik Gomantak
गोवा

एसजीपीडीएतील घोटाळ्याची चौकशी करा : विजय सरदेसाई

मंगळवारी फातोर्डा येथील दोन नाल्यांची सफाई करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

मडगाव : एसजीपीडीएत झालेल्या सोपो घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून दक्षता खात्याकडून त्याची चौकशी करण्याची गरज फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी फातोर्डा येथील दोन नाल्यांची सफाई करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना, सोपोच्या नावाखाली कंत्राटदाराने जे पैसे वसूल केले ते एसजीपीडीएत जमा झालेच नाहीत. या पैशांचे काय झाले त्याची चौकशी झालीच पाहिजे, असे ते त्यांनी सांगितले. सध्या एसजीपीडीएने पाच कोटींचे पाण्याचे बिल भरलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Vijay Sardesai News)

सोनसोडो येथील इंनर्ट (टाकाऊ माती) घालून रवींद्र भवनसमोरील जी जागा भरली जात आहे, त्याचीही सरदेसाई यांनी पाहणी केली. अशा तऱ्हेने जागा भरण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळानेही परवानगी दिली आहे. त्यामुळे लोकांनी या कामास विरोध करू नये, अशी मागणी त्यांनी केली. सोनसोडो येथील ही टाकाऊ माती कुठल्याही प्रकारे काढणे आवश्यक आहे. अन्यथा ती पावसात वाहून येऊन रस्त्यावर पडू शकते. तसे झाल्यास लोकांना त्रास होऊ शकतो. ज्यावेळी सोनसोडोवरील काम सुरू होईल, तेव्हा प्रत्येक आठवड्याला तिथे पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT