Yoga Day 2024  Dainik Gomantak
गोवा

Yoga Day 2024 : ‘युवा’च्‍या योग शिबिराला उदंड प्रतिसाद; १४० जणांनी घेतला लाभ

Yoga Day 2024 : कमलेश बांदेकर टीमने केले मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Yoga Day 2024 :

पणजी, विविध उपक्रम राबवणाऱ्या पणजी-मळा येथील युवा संस्‍थेच्‍या वतीने आज भारत स्‍वाभिमान, पतंजली, ‘एयू’ स्‍मॉल फायनान्‍स बँक, पणजी गुजराती महिला मंडळ व रोटरी क्‍लब ऑफ दोना पावला यांच्‍या सहयोगाने श्री महालक्ष्‍मी मंदिर, हॉलमध्‍ये योग दिन साजरा करण्‍यात आला.

त्‍याचा १४० लोकांनी लाभ घेतला. उद्घाटन प्रसंगी पत्रकार सागर जावडेकर, ब्रह्माकुमारी शोभा बहेनजी, योगगुरू कमलेश बांदेकर, गिरीश परुळेकर (भारत स्वाभिमान), विश्वास कोरगावकर, संध्या खानोलकर (पतंजली), शोभा बहेनजी (ब्रह्मकुमारी), अर्चना शहा (गुजराती महिला मंडळ अध्यक्षा), सीए गौरव केंकरे (आयसीएआय आणि रोटरी क्लब ऑफ दोना पावला), शिवानी राईकवार व निर्मला निषाद (एयू स्मॉल फायनान्स बँक), सर्वेश शेट्ये (अध्यक्ष-युवा), दीक्षा शेट्ये (सचिव-युवा), शशांक सुखठणकर (खजिनदार-युवा आणि चिराग वेरेकर (कार्यक्रम-प्रभारी) उपस्‍थित होते.

या प्रसंगी मानवी जीवनात योग कसा उपयुक्‍त आहे, या संदर्भात माहिती देण्‍यात आली. सकाळी ६ पासून प्रात्‍यक्षिके दाखविण्‍यात आली. कमलेश बांदेकर आणि त्यांच्‍या टीमने आयुष मंत्रालयाच्या दिशानिर्देनुसार कार्यशाळेचे संचालन केले. ‘युवा’च्‍या आयोजनाचे उपस्‍थितांनी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

History: अकबराचा धर्म 'दीन ए इलाही'

Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT