International Yoga Day 2024 Dainik Gomantak
गोवा

International Yoga Day 2024 : राज्‍यातील ९० टक्के युवा आरोग्यदृष्ट्या ‘अनफिट’; योगगुरू सुरेश कुमार यांचा दावा

International Yoga Day 2024 : ‘अगेन्स्ट सनलाईट’ संस्कृती धोकादायक

गोमन्तक डिजिटल टीम

सचिन कोरडे

International Yoga Day 2024:

पणजी, योगा ही आपली संस्कृती आहे. आजची संस्कृती ही उद्याचे वर्तन आणि या वर्तनातूनच अनुभवाची शिदोरी मिळते. आज पाश्चात्य देश ही संस्कृती स्वीकारत असून भारतात मात्र अजूनही योग संस्कृती स्थिरावलेली नाही.

युवकांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. मात्र, याच युवकांचे आरोग्य धोक्यात आहे. गोव्यात ९० टक्के युवावर्ग हा ‘अनफिट’ आहे. कारण, ते ‘अगेन्स्ट सनलाईट’ जगतात.

सूर्योदयापूर्वी उठणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. मात्र, राज्यातील ९० टक्के युवा पिढी ही सूर्योदयापूर्वी उठताना दिसत नाही. त्यामुळेच त्यांच्या आरोग्याबाबत चिंता आहे, असे गोव्यातील योगगुरू सुरेश कुमार यांनी सांगितले.

योगदिनाचे औचित्य साधून गेली २५ वर्षे गोव्यात ‘योगा’चे धडे देणाऱ्या सुरेश कुमार यांच्याशी ‘गोमन्तक’ने संवाद साधला. वरून या संवादातून त्यांनी गोव्यातील वाढत्या आजारांवरही प्रकाश टाकला. योग संस्कृती आता पाश्चात्य देशांनी स्वीकारलेली आहे.

जवळपास २३० देशांमध्ये योग शिकवला जातो. त्यांना संशोधनातून योगाचे महत्त्व पटले आहे. भारतात ही संस्कृती घराघरांत पोहोचायला हवी. पणजी शहराचेच उदारहण घेतले तर आजूबाजूला मेडिकल स्टोअर्स वाढलेले दिसतात. गोमेकॉमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची गर्दी होत आहे. हे आजार एकदम होत नाहीत. त्याला बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे. त्यामुळे युवा पिढीला योगाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यांच्या जीवनशैलीत बदल व्हायला हवा, असेही सुरेश कुमार म्हणाले.

५ हजार क्रीडापटूंसह, शिक्षकांनाही प्रशिक्षण

सुरेश कुमार यांनी आतापर्यंत राज्यातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित ५ हजार व्यक्तींना योगाचे प्रशिक्षण दिले आहे. सरकारने नियुक्त केलेले ते पहिले योगप्रशिक्षक आहेत. शैक्षणिक संस्थांबरोबर काही निमसरकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही ते प्रशिक्षण देतात. वेळोवेळी प्रशिक्षण वर्गांचेही आयोजन ते करतात. ज्यामध्ये विविध बँका, हॉटेल्स, गोवा पोलिस, अग्निशमन विभाग, एनसीसी, विविध महाविद्यालये, संस्था यांचा समावेश आहे.

‘व्हिटॅमिन डी’ फॅक्टर

गोव्यात ६० टक्के आजार हे सूर्यप्रकाश घेत नसल्यामुळे होत आहेत. ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे होणारे आजार वाढत आहेत. सकाळी लवकर न उठल्यामुळे अनेक आजार बळावतात. १८९ आजार हे सायकोसुरॅटीक प्रकारचे म्हणजे ताणतणावामुळे होणारे आहेत. ज्याचा थेट संबंध हा ‘अगेन्स्ट सनलाईट’शी आहे. उशिरा जेवणे, रात्री उशिरा झोपणे हे आरोग्यासाठी अत्यंत धोकायदायक आहे. योग्य आहार-विहार आणि योगा या तिघांची योग्य सांगड असल्यास आपण या आजारांवर मात करू शकतो.

कॅन्सर रुग्णांनाही धडे

सुरेश कुमार यांनी कॅन्सर रुग्णांनाही योगाचे धडे दिले आहेत. औषधांबरोबरच मनोबलवाढीसाठी योगा महत्त्वपूर्ण ठरतो. योग्य आहार आणि योगा केला तर कॅन्सर रुग्ण बरा होऊ शकतो, असे कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, मी तीन रुग्णांना योगाचे धडे देत होतो. त्यांना खूप आराम मिळाला आहे. काही हृदयरोगीही होते. त्यांनीही योगाच्या बळावर या आजारावर मात केली आहे. आहार, विहार आणि योग या त्रिसूत्रीद्वारे तुम्ही आजारावर मात करू शकता, असे सुरेश कुमार यांनी सांगितले.

योग हा ‘बिझनेस’ नव्हे, गुरू

आज ‘योगा’चा प्रचार ज्या पद्धतीने केला जात आहे, त्यावरून त्याचा ‘बिझनेस’ झाल्यासारखा वाटतो. योगा हा ‘बिझनेस’ नसून तो ‘गुरू’ आहे. ही संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योगा’चा प्रचार केला. त्याचे महत्त्व विश्वाला पटवून सांगितले. त्यामुळे योग संस्कृती इतर देशांनी स्वीकारली आहे. मोदींनी योगाचे उत्तमरीत्या ‘मार्केटिंग’ केले आहे आणि ते बरोबरही आहे, असे कुमार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: पणजीतील दिवजा सर्कल येथे कार आणि दुचाकीमध्ये अपघात

SCROLL FOR NEXT