International Year Of Millets 2023 Dainik Gomantak
गोवा

International Year Of Millets: आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षानिमित्त वाळपई आरोग्य संचालनालयातर्फे सायकल रॅली

यंदाचे वर्ष म्हणजेच 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

Kavya Powar

International Year Of Millets 2023

यंदाचे वर्ष म्हणजेच 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. यानिमित्त वाळपई आरोग्य संचालनालयातर्फे सामुदायिक आरोग्य केंद्र ते नगरगाव पंचायतपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

यावेळी वाळपई आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ. विकास नाईक, वाळपई नगराध्यक्ष शेहजीन शेख, नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर, वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, आरोग्य संचालनालयाचे रावजी पालवी, अकीब शेख, डाॅ. वैभव गाडगीळ, डाॅ. जल्मी आदींची उपस्थिती होती.

सुरुवातीला वाळपई आरोग्य केंद्राकडे नगराध्यक्ष शेहजीन शेख व आरोग्याधिकारी डाॅ. विकास नाईक यांच्या हस्ते झेंडा फडकावून रॅलीची सुरुवात करण्यात आली. वाळपई येथून निघालेल्या रॅलीची सांगता नगरगाव पंचायत परिसरात झाली. यावेळी रॅलीला चांगला प्रतिसाद लाभला.

रॅलीत सहभागी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी डाॅ. विकास नाईक, शेहजीन शेख, विश्वनाथ गावस, संध्या खाडीलकर यांनी आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे महत्व सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT