Leander Paes Dainik Gomantak
गोवा

Leander Paes: आता गोव्यातही तयार होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटू; लिएंडर पेसची क्रीडा अकादमी सुरू करण्याची इच्छा

Leander Paes Sports Academy Goa: मूळ गोमंतकीय वंशाचा असलेला भारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस याने गोव्‍यात क्रीडा अकादमी सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले.

Sameer Panditrao

Leander Paes Tennis Academy Announcement Goa

मडगाव: मूळ गोमंतकीय वंशाचा असलेला भारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस याने गोव्‍यात क्रीडा अकादमी सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले.

मडगावच्‍या बीपीएस क्‍लबने शुक्रवारी उभरत्‍या टेनिस खेळाडूंचा लिएंडर पेस याच्‍याबरोबर संवादाचा कार्यक्रम आयोजित केला हाेता. मडगावचे आमदार दिगंबर कामत हेही यावेळी उपस्‍थित होते. बीपीएस क्‍लबचे अध्‍यक्ष योगिराज कामत यांनी सर्वांचे स्‍वागत केले.

पेस म्हणाला, की गोव्‍यातून चांगले खेळाडू पुढे यायला पाहिजेत. जे जागतिक दर्जाचे खेळाडू असतील आणि देशासाठी ऑलिंपिक पदके आणण्‍याची धमक त्‍यांच्‍यात असेल. या खेळाडूंना तयार करण्‍यासाठी अकादमी प्रयत्‍न करणार आहे. या अकादमीत टेनिस खेळावर अधिक भर दिला जाईल.

लिएंडर पेस याला आंतरराष्‍ट्रीय टेनिस ‘हाॅल ऑफ फेम’ पदक देऊन गाैरवित करण्यात आले. हे पदक मी माझी मूळ भूमी असलेल्‍या गोव्‍याला आणि गोवेकरांना समर्पित करतो, असेही तो म्हणाला. खेळात जर पुढे यायचे असेल तर परिश्रम केल्‍याशिवाय पर्याय नाही.

गोव्‍यात जरी माझा जन्‍म झाला नाही तरी मला गोवा आवडतो. गोव्‍यात येणे हे माझ्‍यासाठी एक आनंदाची बाब असतेे. गोव्‍याने मला नेहमीच उर्जा दिली आहे. त्‍यामुळे गोवा आणि गोवेकरांचा मी ऋणी आहे असे त्‍याने सांगितले.

१९९६ साली अटलांटा ऑलिंपिकमध्ये पुरुष टेनिस एकेरीत ब्राँझपदक जिंकलेला ५१ वर्षी लिअँडर दुहेरी टेनिसमधील सर्वोत्तम खेळाडूंत गणला जातो. दुहेरीत त्याने चारही प्रमुख ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम साधला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT