International Nurse Day Dainik Gomantak
गोवा

मडगाव एकेकाळी होते नर्स प्रशिक्षणाचा केंद्रबिंदू

शहराचे परंपरांशी नाते; सध्या बांबोळी येथून सुरू आहे कारभार

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यातील कित्येक परंपरांशी मडगाव शहराचे नाते आहे. त्यापैकीच एक म्हणजे येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्र. जुन्या हॉस्पिसियो इस्पितळासमोर प्रॉव्हिदोरीयाची इमारतीत हे प्रशिक्षण केंद्र चालायचे. येथून शिक्षण घेतलेल्या परिचारिका नंतर राज्यातील विविध इस्पितळात सेवा देत असत. सध्या या केंद्रात मडगाव आरोग्य केंद्राची स्थापना केलेली असली तरी 15-20 वर्षांपूर्वी सुद्धा हे केंद्र चालू होते. नंतर हे केंद्र बांबोळीला हलवण्यात आले.

फक्त मडगावलाच नव्हे तर संपूर्ण गोव्याला तशी परिचारिकांची मोठी परंपरा असून पोर्तुगीज काळापासून ती सुरू असल्याची माहिती गोव्यातील परंपरांचे अभ्यासक वाल्मिकी फालेरो यांनी दिली.

ते म्हणाले, पोर्तुगीज काळात रायबंदर येथे परिचारिका प्रशिक्षण केंद्र चालायचे. कालांतराने दक्षिण गोव्यातील लोकांची मागणी वाढल्याने प्रॉव्हिदोरीया या नावाने चालणाऱ्या एका खासगी ट्रस्टने (जे हॉस्पिसियो इस्पितळही चालवायचे) मडगावात प्रशिक्षण केंद्र सुरू केले. पूर्वीच्या काळात मडगावात माद्र्या (नन्स) ही सेवाभावी वृत्तीने परिचारिकांचे काम करायच्या. नन्समधील मारिया बांबिना या संस्थेतील नन्स हे काम करायच्या. फालेरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नन्स फक्त हॉस्पिसियोच नव्हे तर जुन्या काळात ज्याला ‘सानातोर द सां जुझे’ म्हणून ज्याला ओळखले जायचे, त्या टी. बी. इस्पितळातही या नन्स सेवा द्यायच्या. रुग्णांच्या सुश्रुशेबरोबरच त्या त्यांच्या मनाला उभारी देण्याचेही काम करायच्या.

आंजेला मिरांडा गोम्स यांनी तब्बल 40 वर्षे हॉस्पिसियोत परिचारिका म्हणून सेवा दिली. आजचे गोव्यातील प्रसिद्ध दंत विशारद डॉ. ह्युबर्ट गोम्स यांच्या त्या आई होत. आंजेला या मेट्रन पदावरून निवृत्त झाल्या. इस्पितळातील स्वच्छता आणि शिस्त या दोन गोष्टींवर त्यांचा भर होता. याबद्दल डॉ. गोम्स सांगतात, ‘आजच्या मानाने जुन्या काळातील परिचारिका कमी प्रशिक्षण घेतलेल्या असायच्या. पण त्यांचे काम मानवतेच्या भावनेतून केले जायचे. रुग्ण बरा करणे हे त्यांच्या सेवेचे अंतिम उद्दिष्ट असायचे.’

पूर्वी हॉस्पिसियोचे प्रशासन एक खासगी ट्रस्ट चालवत असल्याने परिचारिकांना कमी पगार मिळायचा. 1965 साली संप पुकारल्यानंतर तत्कालीन दयानंद बांदोडकर सरकारने हॉस्पिसियो सरकारच्या ताब्यात घेतले. त्यामुळे परिचारिकांनाही इतरांप्रमाणे पगार मिळू लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT