IFFI Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2023 : इफ्फीत पहिल्या दिवशी पत्रकारांच्या ओळखपत्रांचा घोळ!

IFFI Goa 2023 : राज्यात १९ वर्षे होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वार्तांकन करण्यासाठी विविध राज्यांतून पत्रकार येतात.

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI Goa 2023 : पणजी, राज्यात १९ वर्षे होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वार्तांकन करण्यासाठी विविध राज्यांतून पत्रकार येतात. त्यात विविध भाषेतील वर्तमानपत्रांचे चित्रपट किंवा सांस्कृतिक क्षेत्राचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा समावेश आहे.

परंतु केंद्रीय पत्रसूचना कार्यालयाकडून या पत्रकारांना ओळखपत्र वेळेत न देण्याची प्रक्रिया अद्यापि सुटसुटीत होण्याचे काही चित्र दिसत नाही.

मुंबईच्या पत्रसूचना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे या पत्रकारांनी विचारणा केली. गेली २७ वर्षे एक महिला पत्रकार इफ्फीचे वार्तांकन करीत आल्या आहेत. त्यांनी पत्रसूचना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे वेळेत ओळखपत्र मिळत नाहीत, याबद्दल तक्रार केली.

आपण थेट केंद्रीय माहिती अधिकारी अनुराग ठाकूर यांना विचारणा करू, असे सांगितल्यांनंतर त्या महिला पत्रकाराची मनधरणी करण्याशिवाय त्या अधिकाऱ्यांकडे पर्याय राहिला नाही.

दरम्यान, पत्रकारांची ओळखपत्र देण्यास या तारखेपासून अमुक वेळेपर्यंत सुरू होणार असल्याचा संदेश व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकण्यात आला. ओळखपत्रे दिली; पण पत्रकारांना पुन्हा चित्रपट कॅटलॉगचे किट घेण्यासाठी काउंटरकडे जावे लागले.

अशी कुठली तांत्रिक अडचण?

यावेळी चित्रपट समीक्षक कोल्हापूरचे अनमोल कोठाडिया यांनाही असाच अनुभव आला. त्यांचेही ओळखपत्र मिळाले नसल्याने त्यांनी पत्रसूचना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. परंतु त्यांनाही तांत्रिक अडचण आल्याचे सांगण्यात आले.

कोठाडिया यांच्याप्रमाणे इतर पत्रकारांनीही आम्ही आमचा प्रश्‍न कोणाकडे मांडणार, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली.

चुकीचा संदेश

पत्रकारांना ओळखपत्रे वाटण्यामध्ये गोंधळ उडाल्याने पत्रकार नाराज झाले. अनेक पत्रकारांनी याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना विचारणाही केली. पण त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. अशा गोंधळामुळे या आयोजनातील त्रुटी सर्वांसमोर आल्या. यातून एक चुकीचा संदेश मात्र सर्वदूर पसरला. आणि तशी चर्चाही सुरू होती.

गोंधळात गोंधळ

इफ्फीत पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींना गोंधळाचा सामना करावा लागला. इफ्फीत कोणते कार्यक्रम कधी असतील याची माहिती पुस्तिका अनेकांना देण्यात आली नाही.

इफ्फी आयोजकांनी बुकिंग तसेच इतर बाबींसाठी संकेतस्थळ अथवा इफ्फी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे; पंरतु काही नवख्या तसेच तंत्रज्ञान सुरळीतपणे हाताळता येत नसलेल्या प्रतिनिधींना या प्रक्रियेचा नाहक त्रास होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT