Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसमध्ये दुही? चोडणकर म्हणतात... 'फक्त लोहिया मैदानावर बोलावले'

Goa Congress: काँग्रेस नेते पत्रादेवी येथील कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने तो चर्चेचा विषय बनला. काँग्रेसमध्येच दुही आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाला उपस्थित राहून एकीचे दर्शन घडविले असले, तरी गिरीश चोडणकर, सुनील कवठणकर, फ्रान्सिस सार्दिन आणि विजय भिके हे उमेदवारीच्या शर्यतीत असलेले काँग्रेस नेते पत्रादेवी येथील कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने तो चर्चेचा विषय बनला. काँग्रेसमध्येच दुही आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात आली.

आज (मंगळवारी) स्थानिक पंच, सरपंच व तलाठी नंतर मडगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला गिरीश चोडणकर यांनी हजेरी लावली.

पत्रादेवी येथील त्यांच्या गैरहजेरीबद्दल विचारले असता, मला त्या कार्यक्रमाची कुणीही कल्पना दिली नव्हती. लोहिया मैदानावर जो कार्यक्रम होता, त्याचेही आमंत्रण मला आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास देण्यात आले, असे चोडणकर यांनी सांगितले.

चोडणकर यांनी दक्षिण गोवा लोकसभा उमेदवारीवर दावा केला होता; पण त्यांना तिकीट नाकारले होते. लोहिया मैदानावर त्यांनी उपस्थिती लावली; मात्र भाषण वगैरे काही केले नाही. याबद्दल विचारले असता, कार्यक्रमाची माहितीच मला उशिरा मिळाली.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा मला फोन आला. तुम्ही लोहिया मैदानावर या, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे मी आलो, असे चोडणकर म्हणाले.

त्यापूर्वी आणखी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चोडणकर यांनी, मी पहिल्यांदाच पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि निवडणुकीची तयारीही केली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. कदाचित त्यांनी वेगळा विचार करून हा निर्णय घेतला असावा, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT