MP Francisco Sardinha On Sao Jose de Areal Incident Dainik Gomantak
गोवा

परवानगीशिवाय पुतळा उभारणे चुकीचे, सां जुझे द आरियल प्रकरणातील गुन्हे मागे घ्या - फ्रान्सिस सार्दिन

पुतळा उभारण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का? याची खातरजमा समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी करायला हवी होती असेही सार्दिन म्हणाले.

Pramod Yadav

MP Francisco Sardinha On Sao Jose de Areal Incident

सां जुझे द आरियाल, बेनाभाट येथे शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरुन वाद झाला. पुतळा उभारण्यासाठी परवानगी नसल्याचा आरोप करत स्थानिकांनी याला विरोध केला. तसेच, पुतळ्याचे आनावरण करुन परतत असताना मंत्री फळदेसाई यांच्यावर माती आणि ढेकळ मारुन हल्ला करण्यात आला.

याप्रकरणी आता दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी प्रतिक्रिया दिली असून, परवानगीशिवाय पुतळा उभारणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सां जुझे द आरियाल, बेनाभाट येथे परवानगी शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे चुकीचे आहे. पुतळा उभारण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक होते. घडलेल्या प्रकारातून 20 जणांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी सार्दिन यांनी केली आहे.

पुतळा उभारण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का? याची खातरजमा समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी करायला हवी होती असेही सार्दिन म्हणाले.

पुतळा उभारण्यावरुन सां जुझे द आरियाल, बेनाभाट येथे शिवजयंती दिवशी मोठा वाद झाला. परवानगी नसल्याच्या कारणावरुन स्थानिकांनी पुतळ्याला विरोध केला.

मंत्री फळदेसाई पुतळ्याचे आनावरण करुन माघारी जात असताना स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. स्थानिकांनी भूमिका मांडल्यानंतर मंत्री माघारी जात असताना त्यांच्यावर जमावाने माती आणि ढेकळ भिरकावले. यात फळदेसाई किरकोळ जखमी झाले होते.

मायणा कुडतरी पोलिसांत याप्रकरणी अज्ञात वीस जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT