INS Hansa Dabolim Goa INS Hansa
गोवा

Honeytrap Case: INS हंसा दाबोळीचे फोटो पाकिस्तानला शेअर केल्याचा संशय, मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याची कसून चौकशी

Honeytrap Case: शिपयार्डमध्ये पार्ट जॉब करत असताना राम सिंगने भारतीय नौदल एअरबेस आणि फायटर प्लेनचे फोटोही पाकिस्तानसोबत शेअर केल्याचा संशय एटीएसला आहे.

Pramod Yadav

Honeytrap Case

हनीट्रॅप प्रकरणात एटीएसच्या पथकाने पिप्राइच, गोरखपूर येथून अटक केलेल्या मर्चंट नेव्ही कर्मचारी राम सिंगच्या मोबाईलमधून अनेक आक्षेपार्ह छायाचित्रे जप्त केलीत. शिपयार्डमध्ये पार्ट जॉब करत असताना राम सिंगने भारतीय नौदल एअरबेस आणि फायटर प्लेनचे फोटोही पाकिस्तानसोबत शेअर केल्याचा संशय एटीएसला आहे.

एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार, एटीएसने याप्रकरणी रामसिंगविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याने भारतातील अनेक धार्मिक स्थळे आणि एअरबेसचे फोटो मोबाईल फोनद्वारे शेअर केल्याची माहिती उघडकीस आली आहे. फॉरेन्सिक तपासासोबतच रामसिंगच्या रिमांडदरम्यान या फोटोंबाबतही चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, हनीट्रॅपचे जाळे टाकलेल्या पाकिस्तानी तरुणीचा एकही फोटो राम सिंगच्या मोबाईलमध्ये सापडला नसल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले आहे. पण, काही ठिकाणचे आणि महिलांचे फोटो सापडले आहेत. यात काही आक्षेपार्ह फोटोंचाही समावेश आहे.

हनीट्रॅप प्रकरणात समाविष्ट गोव्यातील तरुणी आणि मर्चंट नेव्हीचे कर्मचारी लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहितीही एटीएसच्या सूत्रांनी दिली. राम सिंगने गोव्यातील दाबोळी विमानतळाजवळही काम केल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले आहे. नौदलाच्या या तळाजवळ नागरी क्षेत्र देखील आहे.

कंपनीच्या लोकांना जहाजाबाहेर जाण्याची परवानगी नाही, परंतु कंपनीत साफसफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नौदलाच्या जहाजांची साफसफाई करण्यासाठी पाठवले जाते.

याकाळात मर्चंट नेव्हीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या फोनवरून जहाजाच्या रेकॉर्डची छायाचित्रे घेतली असण्याची शक्यता आहे. INS हंसा हा दाबोळी, गोवा येथील भारतीय नौदल हवाई तळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT