Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : गुणवंत विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

एनएसयूआय : एलएलबी प्रवेश परीक्षेच्‍या चौकशीची आग्रही मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : कारे कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्याने आपल्या मुलाच्या फायद्यासाठी परीक्षा प्रक्रियेत फेरफार केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या राज्‍यातील नॅशनल स्टुडंट्‌स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) शाखेने एलएलबी प्रवेश परीक्षेच्‍या चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशीस सुरूवात न केल्यास कुलपती तथा राज्यपालांची भेट घेऊ, असे एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी सांगितले. तेथेही दखल घेतली गेली नाहीतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाईल असा इशारा देऊन त्‍या प्राचार्यास ताबडतोब निलंबित करा, अशी मागणी केली.

काँग्रेस भवनात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेस चौधरी यांच्यासमवेत एनएसयूआयचे सदस्य उपस्थित होते. दै. ‘गोमन्तक’ने हा अनागोंदी प्रकार उघडकीस आणला होता. चौधरी म्हणाले, उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा विद्यापीठाने या प्रकरणात हस्तक्षेप करून संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करावी. गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

चांगले गुण मिळूनही त्यांना डावलले जाण्याची भीती आहे. कारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या मुलाला परीक्षेत उत्तरे देता यावीत म्हणून हा सर्व खटाटोप केला आहे. एलएलबीची प्रवेश परीक्षा कारे कॉलेज ऑफ लॉने घेतली, ती नियमानुसार नाही, असे चौधरी म्‍हणाले.

एनएसयूआयच्‍या काही प्रमुख मागण्या

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी प्राचार्याला निलंबित करा.

मूल्यमापन प्रक्रियेत बदल करून पात्र विद्यार्थ्यांना सामावून घेऊन त्‍यांना न्याय द्या.

पुढील शैक्षणिक वर्षापासून अनियमितता थांबवण्यासाठी संलग्न महाविद्यालयांद्वारे घेण्यात येणारी बीएएलएलबीची प्रवेश परीक्षा गोवा विद्यापीठाने घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT