Colvale Fire Dainik Gomantak
गोवा

Colvale: कोलवाळ स्क्रॅपयार्ड आगीतील जखमी कामगाराची मृत्युशी झुंज अपयशी

3 दिवस मृत्युशी झुंज सुरु होती

Rajat Sawant

मूशीरवाडा-कोलवाळ येथे चार भंगारअड्ड्यांना भीषण आग लागल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. रफान रिझवान खान यांच्या मालकीच्या भंगारअड्ड्यात सकाळी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी त्याची ठिणगी पडून ही आग लागल्याचे सांगण्यात आले. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण करून इतर शेजारील भंगारअड्ड्यांमध्ये पसरली. बुधवारी सायंकाळपर्यंत म्हापसा, पिळर्ण, पर्वरी व पेडणे अग्नीशमन दलाचे मिळून 40 पेक्षा जास्त पाण्याचे बंब वापरले गेले होते.

दरम्यान, या आगीत एक कामगार गंभीर स्वरुपात जखमी झाला होता. यासीन शेख (56) असे त्याचे नाव आहे. जखमी झाल्याने रुग्णवाहिकेतुन त्याला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, स्थिती गंभीर असल्याने त्याला गोमेकॉत पुढील उपचारार्थ हलवण्यात आले. तो जवळपास 70 टक्के भाजला होता. त्याची 3 दिवस मृत्युशी झुंज सुरु होती. अखेर त्याची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी मालकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे

या चारही भंगारअड्ड्यांत निरुपयोगी टाकाऊं वस्तू होत्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खराब टायर, ट्यूब्स, १०० एसीचे संच, बॅरल, फायबर, पुटे, रासायनिक पदार्थ, वीजवाहिन्यांच्या तारा आदि साहित्य या आगीत भस्मसात झाले. ही आग पसरत असल्याने येथील कामगारांनी काही साहित्य तसेच महत्वांची कागदपत्रे बाहेर काढली. मात्र, हे प्रयत्न अपुरे पडले. कारण आगीने रौद्ररूप धारण केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT