Crime News Dainik Gomantak
गोवा

'त्या' जखमी महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू; फातोर्डा पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद

पतीवर खुनाचा गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

मडगाव: घरगुती वादातून पतीकडून जबर मारहाण झालेली नसीम बी हिच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू असताना आज सकाळी मृत्यू झाल्याने पती अब्दुल रौफ याच्या विरुद्ध फातोर्डा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. ही घटना 17 ऑगस्ट रोजी घडली होती.

(Injured woman dies during treatment in Margao Fatorda police registered a case )

मूळ होस्पेट येथील मात्र सध्या घोगळ हौसिंग बोर्ड येथे राहणाऱ्या अब्दुल रौफ याचे आपल्या पत्नीशी नेहमीच खटके उडायचे. असाच खटका 17 रोजी रात्री त्यांच्यात उडाला होता. त्यानंतर पत्नी झोपायला गेली असता रौफने तिच्या डोक्यात दांडा मारून जबर जखमी केले होते. त्यानंतर घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला शेजाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

या प्रकरणी नंतर आरोपीच्याच मुलाने आपल्या वडिलांच्या विरोधात तक्रार केली होती. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची कालांतराने तब्येत बिघडल्याने त्यालाही गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी जबर जखमी झालेल्या नसीम बीचा मृत्यूपूर्व जबानी घेण्याचा प्रयत्न फातोर्डा पोलिसांनी केला होता.

मात्र तिची प्रकृती जबानी देण्याइतपत सक्षम नसल्याने पोलिसांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. प्रारंभी या प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला होता. मात्र आज नसीम बी हिच्या मृत्यूनंतर आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT