Goa nutrition diet Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय पोषण आहारात होतेय घुसखोरी?

गोवा महिला व बाल विकास खात्‍याची जाहिरात सदोष

दैनिक गोमन्तक

पणजी: आंबाडी उड्डमेथी, वडियो किसमूर, सोया चंक चिली, सांगे सुंगटा भाजी, तिसरे सुके, सुंगटा डांगोर, टेनेरी यासह अन्‍य 108 पाककृती गोवेकरांचे पौष्टिक, पारंपरिक पदार्थ म्हणून वृत्तपत्रात (दै. गोमन्तक नव्हे) प्रसिद्ध झालेल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्‍यानंतर लोकांत खळबळ माजली व चर्चेला सुरवात झाली.

राज्य सरकारच्या महिला व बाल विकास खात्याने पोषण सप्ताहाच्या सांगता दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीतून शासकीय खात्यांचा कारभार कसा भरकटतोय हे चव्हाट्यावर आले आहे. जाहिरातीत प्रसिद्ध झालेल्या पदार्थांची नावे, अनुवाद चुकीचा आहे. तसेच चुकीच्या पाककृतींचा समावेश गोमंतकीय पारंपरिक पौष्टिक आहार म्हणून प्रसिद्ध करून चुकीचा संदेश देश, विदेशांत पोहोचविला आहे. आंबाड्यांचा समावेश पोषण आहारात होऊ शकतो. परंतु, जाहिरातीत आंबाड्याचे ‘आंबाडी’ हे नाव देण्याचा पराक्रम झाला. कांदा भज्यांचे नाव कांदा भाजी करणे, वड्यांचो रोस ‘वडयो रोस’ तर वड्यांची किसमूर ‘वडियो किसमूर’ यासारख्‍या त्रुटी आहेत.

पौष्‍टिक अन्न म्‍हणजे काय, हे आहार तज्‍ज्ञांकडे सल्लामसलत केल्‍यानंतरच समजले असते. असे काहीही प्रकार लोकांच्‍या माथी मारणे अयोग्‍य आहे.

-नीना नाईक, कार्यकर्ती, पणजी.

गोमंतकीय पोषण आहारात होतेय घुसखोरी?

  • या जाहिरातीत मासळीपासून तयार करावयाच्या अधिक पदार्थांचा समावेश आहे. बांगडे, कुर्ल्या, इसवण, तिसऱ्या, सुंगटे (कोळंबी) ही मासळी गोमंतकीयांचीच नव्हे तर पर्यटकांचीही आवडती आहे. तरीही ती मासळी पोषक आहार म्हणून समाविष्ट होऊ शकत नाही.

  • उलट ही मासळी किंवा त्या मासळीपासून बनविलेले पदार्थ जास्त प्रमाणात, सतत खाऊ नये म्हणून काळजी घेण्यास सांगितले जाते. गरोदरपणात महिलांनीही मासळीचे जेवण टाळावे असे बजावण्यात येते.

  • चांदीसारखी पांढरी चमचम करणारी इटुकली वेर्ली, मुडदशा इत्यादी मासळी प्रामुख्याने पौष्टिक आहारात असावी, असे सांगण्यात येते.

  • गोव्यातील पौष्टिक, पारंपरिक पदार्थ म्हणून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतून तिसऱ्या, बांगडे, कुर्ल्या, माणक्याच नव्हे, तर इसवणाचे हुमण, सुके ठळकपणे दिसतात.

  • पालक पनीर, पनीर तोणाक, सोया चंक चिली हे पदार्थ 108 पदार्थांत जाहिरातीत दिसतात. परंतु, ते खरोखरच गोमंतकीयांचे पारंपरिक पदार्थ आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.

  • पालक, पनीर, सोया पासून बनवलेल्या पदार्थांना गोव्यातील भोजनात अलीकडे वाढते स्थान मिळत आहे, हे वास्तव आहे. परंतु, त्यांचा पारंपरिक पदार्थांत का समावेश करावा? असाही लोकांकडून उपस्‍थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT