Industry Association strike on 20th

 

Dainik Gomantak

गोवा

...त्यामुळे उद्योग संघटनेचा 20 रोजी संप; देशाला 25 हजार कोटींचा भुर्दंड

कच्च्या मालाच्या किमती कमी करण्याच्या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी गोवा राज्य उद्योग संघटनेने 20 डिसेंबर रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Industry Association Strike: कच्च्या मालाच्या किमती कमी करण्याच्या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी गोवा राज्य उद्योग संघटनेने 20 डिसेंबर रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात राज्यातील अडीच हजार लघु व सूक्ष्म उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी केले आहे.

  • देशभरातील 10 लाख उद्योग होणार सहभागी

  • राज्यातील अडीच हजार उद्योजकांचा सहभाग

  • देशाला तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा भुर्दंड

  • उद्योग संघटनेचे पंतप्रधानांना साकडे

या आंदोलनांतर्गत संबंधित जिल्हाधिकारी, तसेच मामलेदार कार्यालयांसमोर शांततापूर्ण पद्धतीने एक तास निदर्शने केली जातील. सध्या कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. याप्रश्नी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी देशपातळीवर उद्योजकांनी संप (Strike) पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना गोवा राज्य उद्योग संघटनेने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या संपात देशभरातील 10 लाख लघु व सूक्ष्म उद्योग सहभागी होणार असून, यामुळे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. राज्यातील लघु व सूक्ष्म उद्योगांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहनही कोचकर यांनी केले आहे.

एक तास निदर्शने :

20 डिसेंबर रोजी भारतातील सर्व उद्योग एक दिवसीय बंद पाळतील. कच्च्या मालाच्या किमती कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, यासाठी जिल्हाधिकारी/जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर एक तास निदर्शने करण्यात येतील. संपूर्ण भारतातील सुमारे 10 लाख एमएसएमई एआयसीएच्या या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रमुख कामगार संघटनांचा सहभाग :

कोडीसिया, तनस्तिया, सीएमा, आयसीसीआयसी, आयआयएफ, अरिसे इत्यादी प्रमुख संघटना या एकदिवसीय बंद आणि निदर्शनात सहभागी होणार आहेत. पंजाब, हरियाणा, ओरिसा, आसाम, कर्नाटक या राज्यांतील एमएसएमई संघटना संपात सहभागी होणार आहेत. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील उद्योजक एक दिवस कामकाज बंद करून आम्हाला पाठिंबा देत आहेत, असे कोचकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT