Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: आमदारांची ‘हजेरी’ घेऊन त्‍यांना पक्षशिस्तीचे ‘धडे’; भाजपच्या बेशिस्तीची गाज दिल्लीपर्यंत

Sadanand Tanavade: दोन दिवस पक्ष संघटनात्‍मक बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत असलेले प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे वरिष्ठांकडून त्याबाबत विचारणा झाली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सत्ताधारी भाजपच्या गोटात उफाळून आलेल्या बेशिस्तीची गाज दिल्लीपर्यंत पोचली आहे. गेले दोन दिवस पक्ष संघटनात्‍मक बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत असलेले प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे वरिष्ठांकडून त्याबाबत विचारणा झाली. त्‍यामुळे गोव्‍यात परतल्‍यावर तानावडे मंत्री, आमदारांची ‘हजेरी’ घेऊन त्‍यांना पक्षशिस्तीचे ‘धडे’ देणार आहेत.

महाराष्ट्रासह इतर राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्‍या तयारीसाठी भाजपने दिल्लीतील मुख्यालयात उच्चस्तरीय बैठका घेतल्‍या. संसदेचे अधिवेशन संपूनही तानावडे या बैठकांसाठी दिल्लीत राहिले आहेत. याच बैठकांदरम्यान गोव्‍यातील संघटनात्मक कामांबाबत विषय चर्चेला आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे २३ रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्‍यामुळे राज्यातील प्रश्नांचा आढावा या बैठकांदरम्यान घेण्यात आला.

मंत्री, आमदारांकडून करण्‍यात येत असलेल्‍या वक्तव्यांमुळे सरकारची व पक्षाची प्रतिमा डागाळली गेल्याचे परखड मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ‘सुदिन ढवळीकर हे चांगले सार्वजनिक बांधकाममंत्री होते’ असे जाहीर प्रमाणपत्र दिले आहे. सध्या हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने ‘ते काम करत नाहीत’ असा एखादा मंत्री कसा काय म्हणू शकतो? अशी विचारणाही तानावडे यांना करण्यात आली.

विधानसभा अधिवेशन काळात सत्ताधारी आमदारांनी अनेक विषय मांडले. अनेकदा तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर बोलताना विरोधी आमदारांपेक्षा सत्ताधारी आमदारांचीच भाषा फार तिखट होती.

सत्ताधारी आमदारांना सरकार किंमत देत नाही किंवा हे सरकारच काम करत नाही असे चित्र त्यातून तयार झाल्याकडे तानावडे यांचे लक्ष वेधण्यात आले. २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक आहे. मंत्री व आमदारांना भाजप पक्षशिस्त म्हणजे काय हे सांगण्यात आले नाही तर निवडणुकीत त्रास होऊ शकतो, याकडेही तानावडे यांचे लक्ष वेधण्‍यात आले.

सरकारवर दबावाचा प्रयत्‍न नको

लोकशाहीत आमदारांनी लोकांचे प्रश्‍‍न मांडले पाहिजेत. पण ते पक्षाच्या चौकटीत राहून. बऱ्याचदा प्रश्न सुटण्यास विलंब लागू शकतो. त्यावेळी आमदारांनी समजून घेतले पाहिजे. कोणत्याही समाज घटकाचे समर्थन आमदाराने करण्यात काही गैर नाही, मात्र बैठकांपूर्वी किंवा नंतर बाहेर येऊन त्याबाबत मत प्रदर्शन करून सरकारवर दबाव टाकण्याचे प्रकार केले जाऊ नयेत अशी समज त्यांना देण्यात यावी, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना करण्यात आली आहे.

याच आठवड्यात बैठक; कोणाला काही समस्‍या असेल तर सांगावी

याबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षशिस्तीची चौकट कोणीही मोडू नये असे सर्वांना या आठवड्यात बैठक घेऊन सांगणार आहे असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील बैठकांविषयी कोणतीही माहिती देण्‍यास नकार देऊन ते म्हणाले, भाजप हा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. कोणाला काही समस्या असेल तर मला किंवा मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना देता येते. जाहीर वक्त्यव्यांतून प्रश्‍‍न सुटत नाहीत. पक्षाची स्थानिक पातळीवरील गाभा समिती सर्वोच्च असते. ती सर्व निर्णय घेऊ शकते. उठसूट आपली मते माध्यमांकडे व्यक्त करणाऱ्यांना पक्षशिस्तीचे धडे द्यावेच लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT