Mopa Airport  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: खोशयेची खबर! गोवा ते अबूधाबी आता थेट विमानसेवा; अवघ्या साडे तीन तासांचा प्रवास, तिकीटाचे दर जाणून घ्या

इंडिगोकडून सुरु झालेल्या या सेवेमुळे आता प्रवाशांना नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे

Ganeshprasad Gogate

Mopa Airport इंडिगो विमान कंपनीने प्रवाशांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी दिलीय. इंडिगो एअरलाईन्सतर्फे गोवा ते अबुधाबी अशी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबूधाबी (संयुक्त अरब अमिराती - UAE) पर्यंत हे थेट उड्डाण असेल. ही विमानसेवा 2 सप्टेंबरपासून सुरु होणार असून कंपनीने तिकीटदर देखील जाहीर केले आहेत.

तिकीट दर 20 हजार पासून सुरु असून प्रवाशांना थेट गोवा ते अबुधाबी पर्यंत प्रवास करता येणार आहे. 2 सप्टेंबरला रात्री 12 वाजता सुटणाऱ्या विमानाचा तिकीट दर 20, 232 एवढा असून हे विमान 2. 15 अबुधाबीला पोहोचेल.

तसेच 4 आणि 7 सप्टेंबरला देखील याच वेळेत ही फ्लाईट सुटणार आहे. दरम्यान या विमानसेवेमुळे गोमंतकीयांसोबतच लगतच्या राज्यातील प्रवाशांना सुद्धा याचा फायदा होणार असून साहजिकच गोवा सरकारच्या तिजोरीत भर पडणार आहे.

Ticket Rate Chart

याअगोदर इंडिगो एअरलाईन्सतर्फे मोपा विमानतळावरून अमृतसर, भुवनेश्वर, कोईम्बतूर, गुवाहाटी, रांची, राजकोट, विशाखापट्टणम आणि लखनौ या ठिकाणी आपली सेवा सुरू केली आहे. याशिवाय विस्तारा विमान कंपनीनेही लखनौ-गोवा जोडले आहे.

‘इंडिगो’कडून मोपा विमानतळावरून आठवड्याला 168 उड्डाणे होत असून देशांतर्गत 8 स्थळांमध्ये हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे.

गोवा हे पर्यटकांचे आवडते स्थळ असल्यामुळे इंडिगोकडून सुरु झालेल्या या सेवेमुळे आता प्रवाशांना नवीन पर्याय उपलब्ध होऊन प्रवासही अधिक परवडणारा आणि उत्तर गोव्याच्या प्रगतीसाठी परिणामकारक ठरू शकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT