Indigo Flights Dainik Gomantak
गोवा

Flights To Goa: छत्रपती संभाजीनगर ते गोवा थेट विमानसेवेची घोषणा, जूनपासून आठवड्याला तीन फ्लाईट्स

Flights To Goa: इंडिगो विमान कंपनीने नागपूर ते उत्तर गोवा ( छत्रपती संभाजीनगर मार्गे) विमानसेवेचे घोषणा केली आहे.

Pramod Yadav

Flights To Goa

इंडिगो विमान कंपनीने छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) ते गोव्यासाठी थेट विमानसेवेची घोषणा केली आहे. नागपूर येथून उड्डाण घेणारे विमान छत्रपती संभाजीनगर मार्गे उत्तर गोव्यात येईल. येत्या ०२ जूनपासून ही विमानसेवा सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यातील तीन दिवस या फ्लाईट्स सुरु राहतील. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी या फ्लाईट्स नागपूर ते गोवा (संभाजीनगर मार्गे) ऑपरेट करतील.

या थेट विमानसेवेमुळे छत्रपती संभाजीनगर ते उत्तर गोवा हे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे. तर, नागपूर ते संभाजीनगर हे अंतर दीड तासांत पूर्ण होईल. प्रवासी आणि पर्यटकांनी पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा या उद्देशाने या मार्गाची घोषणा करण्यात आलीय.

कामानिमित्ताने तसेच पर्यटनासाठी ये-जा करण्यासाठी नागरिकांना या विमानसेवेचा फायदा होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

दर आठवड्याला मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ०९.४० वाजता सुटणारी फ्लाईट सकाळी अकरा वाजता उत्तरेतील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.

नव्याने सुरु होणाऱ्या या विमानसेवेमुळे छत्रपती संभाजीनगर ते उत्तर गोवा प्रवासाचे तब्बल बारा तासांची बचत होईल. तर, नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या प्रवासात साडे तीन तासांची बचत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT