Advalpal Mine|Danger Canva
गोवा

Advalpal Mining: पुन्हा खाणरूपी संकट! अडवलपाल गावालगत केळ-पीर्ण येथे खाण सुरू होण्याचे संकेत

Advalpal: अडवलपाल आणि केळ येथील खाणी सुरू झाल्यास दोन्ही गावांचे अस्तित्व नष्ट होईल, अशी भीती लोकांमध्ये आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining

डिचोली: अडवलपाल गावाच्या मानगुटीवर आता सीमेबाहेरील खाणरूपी ‘भूत’ बसणार आहे. अडवलपालसह या गावाला लागून असलेली खाण सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आधीच संकटात आलेल्या अडवलपाल गावासमोर आणखी एक भयानक संकट उभे ठाकले आहे.

पर्यावरणीय दाखला (ईसी) मिळालेल्या ‘फोमेंतो’च्या खाणीला अडवलपालवासीयांनी विरोध दर्शविला असतानाच, अडवलपाल गावाला लागून असलेली केळ-पीर्ण येथील खाण सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे केळसह अडवलपाल गावासमोरील धोका अधिक गडद बनला आहे. पीर्ण-थिवी खाण ब्लॉकअंतर्गत खाणीसाठी गुरुवारी डिचोलीत जनसुनावणी झाली. अल्प प्रतिसाद मिळालेल्या या जनसुनावणीवेळी खाणीला मिळालेले समर्थन पाहता, ‘मेसर्स काय इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’ या खाणीला पर्यावरणीय दाखला मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

जनसुनावणीवेळी खाणीला विरोध झाला नसला, तरी खाणीविरोधात पीर्णमधील केळ गावासह अडवलपालमधून खदखद व्यक्त होत आहे. अडवलपाल आणि केळ येथील खाणी सुरू झाल्यास दोन्ही गावांचे अस्तित्व नष्ट होईल, अशी भीती लोकांमध्ये आहे. त्यातल्या त्यात केळ येथील खाणीपासून अडवलपालवासीयांना अधिक भीती वाटते. खाणबंदीपूर्वी अडवलपाल आणि केळ गावच्या माथ्यावर सुरू असलेल्या खाण व्यवसायामुळे येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.

पंचायतीच्या निर्णयाला आक्षेप

खाण व्यवसायामुळे जनतेला भोगाव्या लागणाऱ्या संभाव्य परिणामांची दखल घ्यावी. गावातील समस्या अगोदर सोडवाव्यात. नंतरच खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी अडवलपालच्या दोन ग्रामसभांत ग्रामस्थांनी केली होती. गाव उद्धवस्त होत असेल, तर आम्हाला खाण व्यवसाय नकोच, अशी लोकांची मागणी आहे.

न्यायालयात जाणार

खाण व्यवसायाला विरोध नाही. मात्र, गाव उदध्वस्त होत असेल तर खाण व्यवसाय काय कामाचा? मंदिरे, नैसर्गिक जलस्रोत आणि शेती-बागायती खाण परिक्षेत्रातून बाहेर काढाव्यात. नंतरच खाण व्यवसाय सुरू करावा, असे मत माजी सरपंच प्रेमानंद साळगावकर यांच्यासह आनंद गाड यांनी व्यक्त केले आहे. गावाच्या अस्तित्वासाठी न्यायालयात दाद मागणार, अशी भूमिका लोकांनी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: आढळले मृत डॉल्फिनचे पिल्लू

SCROLL FOR NEXT