Antarctica Base 
गोवा

भारताने अंटार्क्टिकामध्ये 60 दिवसांत उभारले होते वैज्ञानिक तळ; गोव्यातून सुरु झालेले 40 वर्षापूर्वीचे टॉप सिक्रेट मिशन

भारताच्या अंटार्क्टिका मिशनमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी मिशन संबंधित आठवणींना उजाळा दिला.

Pramod Yadav

India's Top Secret Antarctica Operation Gangotri: जगभरात 01 डिसेंबर हा अंटार्क्टिका दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रा (NCPOR) ने गोव्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भारताच्या अंटार्क्टिका मिशनमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी मिशन संबंधित आठवणींना उजाळा दिला.

भारताची पहिली अंटार्क्टिका मोहीम 1981 मध्ये सुरू झाली, 40 वर्षापूर्वीच्या या टॉप सिक्रेट मिशनमध्ये भारताने अंटार्क्टिकामध्ये 60 दिवसांत उभारला वैज्ञानिक तळ उभारला होता.

'दक्षिण गंगोत्री' असे नाव देण्यात आलेल्या मोहिमेत वैज्ञानिक आणि भारतीय नौसेना, वायुसेना आणि भारतीय सैन्याचा समावेश होता.

'या मिशनबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती, मिशनमध्ये सहभागी लोकांच्या कुटुंबीयांनाही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. एवढेच नव्हे तर ज्या लोकांनी प्रशिक्षण दिले त्यांना देखील याबद्दल काहीही माहिती नव्हती,' असे शुक्रवारी पार पडलेल्या कार्यक्रमात मिशनबद्दल सांगताना यातील सहभागी सदस्यांनी सांगितले.

अंटार्क्टिका मोहिमेवर गेलेल्या टीमचे नेतृत्व डॉ. एस.झेड. कासिम यांनी केले. गोव्यातील मुरगाव येथून शास्त्रज्ञांनी मिशनला सुरुवात केली आणि 1983 मध्ये अंटार्क्टिकामध्ये भारताचे पहिले वैज्ञानिक तळ स्थापन केले.

'मिशनबाबत सर्व बैठका बंद दाराआड झाल्या. या बैठकांमध्ये कॅबिनेट सचिव आणि नौदल प्रमुख स्तरावरील अधिकारी सहभागी झाले होते. जेम्स बाँड सारख्या चित्रपटात आहोत असे आम्हाला वाटले,' असे मिशनमध्ये सहभागी असलेले अमितव सेन गुप्ता यांनी सांगितले.

मिशनमध्ये सहभागी झालेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांनाही याबद्दल सांगू नका असे निर्देश देण्यात आले होते, असे गुप्ता यांनी सांगितले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही तळ स्थापन करण्यासाठी खूप मदत केली, असे डॉ. हर्ष के गुप्ता म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

SCROLL FOR NEXT