Dr. S. Somnath Dainik Gomantak
गोवा

Space Mission: अंतराळात 2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन

Space Mission 2035: एस. सोमनाथ: विज्ञान परिषदेचे उद्‌घाटन

दैनिक गोमन्तक

Space Mission 2035:

अंतराळ विज्ञान प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण आहे. ते प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव टाकते. ‘चांद्रयान’ तसेच ‘आदित्य एल-1’ आदी मोहिमांच्या यशांनी आम्हाला या क्षेत्रात अधिक स्फूर्ती दिली आहे. अंतराळ विज्ञानात उंच भरारी घेण्याची ही वेळ आहे.

विकसित भारत २०४७ अंतर्गत २०४० पर्यंत चंद्रावर भारतीयाला उतरविण्याचे तसेच २०३५ पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन बनविण्याचे लक्ष आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली.

डॉ. श्‍यामा प्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियमवर आयोजित २२ व्या राष्ट्रीय अंतराळ विज्ञान परिषदेच्या उद्‍घाटन सत्रानंतर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, माजी इस्रो प्रमुख किरण कुमार, कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन आदी मान्यवर उपस्थित होते.

एस. सोमनाथ म्हणाले, येत्या काळात शुक्र आणि मंगळ ग्रहावर देखील इस्रोद्वारे मोहिमा राबविल्या जातील. इस्रोने कमी खर्चात मोठमोठ्या मोहिमा राबवत त्या पूर्ण केल्या आहेत.

‘इस्रोचा गोव्यातही प्रकल्प व्हावा’

अंतराळ विज्ञानात आमची सर्वश्रेष्ठ देशांमध्ये गणना होते. यात प्रामुख्याने इस्रोच्या शास्त्रज्ञांचे बहुमूल्य योगदान आहे. येत्या काळात अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल. इस्रोचा गोव्यातही प्रकल्प व्हावा यासाठी सरकार मदत करण्यास तत्पर असल्याचे जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

मातृभाषेतून उच्च शिक्षण: राज्यपाल

गोवा विद्यापीठ नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याच्या प्रयत्नात आहे. २२ वी राष्ट्रीय अंतराळ विज्ञान परिषद विद्यार्थ्यांसाठी, तरुणाईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या देशात गेल्या वर्षापासून इंजिनिअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून देण्यात येत आहे. आरोग्य, विज्ञान, इंजिनिअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून देण्याच्या अनुषंगाने विचार करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT