Python Dainik Gomantak
गोवा

Python Found In Car Bonnet: अबब! वास्कोत कारमध्ये आढळला भला मोठा अजगर अन्...

आमदार साळकरांच्या प्रसंगावधानामुळे अजगराला मिळाले जीवदान

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को स्वतंत्रपथ मार्गालगत असणाऱ्या गॅरेजमध्ये दोन दिवसांपुर्वी एक कार दुरुस्तीसाठी आली होती. या कारच्या इंजिनमध्ये आज भला मोठा अजगर आढळला आहे. अन् या अजगराला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. मात्र आमदार साळकरांच्या प्रसंगावधानामुळे या अजगराला जीवदान मिळाले आहे.

(Indian Rock Python was found on the bonnet of a car in vasco)

मिळालेल्या माहितीनुसार आज वास्को स्वतंत्रपथ मार्गालगत गॅरेजमध्ये एक कार दोन दिवसांपुर्वी दुरुस्तीसाठी आली होती. आज मॅकनिकने दुरुस्तीसाठी या कारचे बोनेट उघडले असता. यामध्ये भला मोठा अजगर दिसून आला. त्यामुळे या अजगरास पाहण्यासाठी काही वेळातच नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. मात्र गॅरेज मॅकनिकने इतरांना घडला प्रकार सांगत अजगरला इंजिनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. मात्र काही वेळाने साप पकडणार्‍या संघटनेच्या अधिकार्‍याने अजगरला पकडून वन विभाकडे सोपवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वास्को स्वतंत्रपथ मार्गाच्या बाजूस दोन दिवसांपुर्वी दुरुस्तीसाठी आलेलेल्या चारचाकी कारमध्ये अजगर असल्याचे दिसून आले. यावेळी मॅकनिकने इतरांच्या मदतीने अजगरला काढण्यासाठी प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही.

यावेळी उपस्थित असलेल्यांनी देखील अजगर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना जमले नाही. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर तेथे पोचले व त्यांनी साप पकडणार्‍या संस्थेला संपर्क साधत माहिती दिली. यानंतर साप पकडणार्‍यांनी अजगरला चारचाकी वाहनातून काढून वन विभागाच्या स्वाधीन केले. त्यामूळे या अजगरास जीवदान मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT