Former Minister Mikey Pacheco: Dainik Gomantak
गोवा

Mikey Pacheco: इतरांप्रमाणेच सिक्वेरांचाही भारतीय पासपोर्ट रद्द करावा

Mikey Pacheco: पाशेको : पोर्तुगीज नागरिकत्वाचा पुरावा असल्याचा दावा

दैनिक गोमन्तक

Mikey Pacheco: गोवा सरकारमध्ये नव्याने मंत्री झालेले आलेक्स सिक्वेरा यांचा जन्म केनियात झाला व पोर्तुगालमध्ये त्यांच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ते भारतीय नागरिक ठरू शकत नसल्याचा मुद्दा माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी उपस्थित केला आहे. इतर गोमंतकीयांप्रमाणेच सिक्वेरांचादेखील भारतीय पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी मिकी पाशेको यांनी केली.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मिकी पाशेको म्हणाले की, मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा 1957 साली केनियात जन्म झाला. २७ मार्च २००१ मध्ये त्यांनी पोर्तुगालमध्ये जन्म झाल्याचे नोंदवले आहे. परदेशातील जन्म व पासपोर्ट नोंदीमुळे भारतीय नागरिकत्व त्यांनी गमावले आहे. पासपोर्ट कार्यालयीन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सिक्वेरांचा पासपोर्ट रद्द केला नाही तर 15 दिवसांत पुढील निर्णय घेणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत ‘पासपोर्ट रद्द’चा प्रश्र्न उपस्थित केला होता, याबाबत पाशेको यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. पण मंत्री आलेक्स सिक्वेरा हे पोर्तुगीज नागरिक की भारतीय आहेत, हे स्पष्ट होत नाही, अशी शंका त्यांनी उपस्थित केली होती.

मंत्री आलेक्स सिक्वेरा पोर्तुगीज नागरिक असल्याचा पुरावा माझ्याकडे आहे. ‘आसेंतो दो नासिमेंतो’च्या 644 -ई-1 क्रमांकानुसार पोर्तुगीज नागरिक म्हणून त्यांनी नोंदणी केली आहे. जर त्यांनी नंतर हा दाखला रद्द करून भारतीय नागरिकत्व स्वीकारले असेल तर तो दाखला दाखवावा किंवा सरकारने तसे स्पष्ट करावे, असेही पाशेको यापूर्वी म्हणाले होते.

गोमंतकीय परदेशात कष्ट करून पैसे कमवतात व आरजीचे प्रमुख मनोज परब हे पक्ष चालविण्यासाठी या लोकांकडून भीक मागत आहेत. ही भीक देणे परदेशातील लोकांनी त्याला बंद करावे. तो कलेक्शन एंजट म्हणून गोव्यात वावरत आहेत. त्यांच्याकडे मते नाहीत. मात्र, भाजप व काँग्रेसची मते फोडण्याचे काम ते करतात, हे लोकांनी लक्षात घ्यावे.
- मिकी पाशेको, माजी पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT