Lt Cdr Roopa A & Lt Cdr Dilna K Dainik Gomantak
गोवा

INSV Tarini: 4 खंड, 3 महासागर, 3 ग्रेट केप्स आणि 25,400 नॉटीकल मीलचा प्रवास; 8 महिन्यांनतंर तारिणीच्या रणरागिणी गोव्यात दाखल होणार

Navika Sagar Parikrama: नौदलाच्या ‘तारिणी’ या नौकेने यशस्वीपणे आठ महिन्यांची जागतिक परिक्रमा पूर्ण केल्यानंतर तिच्या विजयी दलाचे स्वागत करण्यासाठी गुरुवारी (ता. २९) मुरगाव बंदरावर ‘फ्लॅग-इन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज (ता. २९) दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. ‘तारिणी’ नौका परिक्रमेचा यशस्वी समारोप समारंभ आणि नौदल अधिकाऱ्यांशी संवाद असे त्यांचे दोन जाहीर कार्यक्रम आहेत.

नौदलाच्या ‘तारिणी’ या नौकेने यशस्वीपणे आठ महिन्यांची जागतिक परिक्रमा पूर्ण केल्यानंतर तिच्या विजयी दलाचे स्वागत करण्यासाठी गुरुवारी (ता. २९) मुरगाव बंदरावर ‘फ्लॅग-इन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विशेष समारंभाचे अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भूषविणार आहेत.

‘नविका सागर परिक्रमा-दोन’ मोहिमेअंतर्गत पार पडलेली ही नौकायात्रा चार खंडांमध्ये साकार झाली असून, भारताच्या नौदल इतिहासातील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

या उल्लेखनीय परिक्रमेसाठी नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए. आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के. यांनी डबल-हँडेड मोडमध्ये म्हणजेच केवळ दोघींनी ही संपूर्ण सागरी मोहीम पार पाडली. या धाडसी मोहिमेच्या माध्यमातून भारताची समुद्री परंपरा, अन्वेषणाची वृत्ती आणि नारीशक्तीचे तेजपूर्ण दर्शन घडले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह २९ व ३० मे रोजी गोव्यात राहणार असून, या काळात ते नौदल अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. इस्राईलच्या हल्ल्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये ठार झालेला ‘हमास’चा माजी प्रमुख याह्या सिन्वरचा महंमद हा भाऊ होता.

‘हमास’च्या गाझामधील शेवटच्या कमांडर्सपैकी एक असलेला महंमद ‘हमास’च्या कमांड सेंटरमध्ये लपला होता. इस्राईलच्या सैन्याने केलेल्या ड्रोन हल्ल्यात या कमांड सेंटरला अचूक लक्ष्य करण्यात आले होते. खान युनूस शहरातील युरोपियन हॉस्पिटल येथे हे कमांड सेंटर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT