316 aircraft dainik gomantak
गोवा

भारतीय नौदल हवाई स्क्वाड्रन ३१६ विमान आयएनएस हंसा येथे होणार कार्यान्वित

जी आयएनएएस राजाली-अरकोनम येथे तैनात

दैनिक गोमन्तक

वास्को : भारतीय नौदल हवाई स्क्वाड्रन ३१६ विमान मंगळवार (दि. २९ मार्च रोजी) आयएनएस हंसा येथे कार्यान्वित होणार आहे. गोवा येथे ऍडमिरल आर हरी कुमार (PVSM, AVSM, VSM, ADC), नौदल प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यान्वति केले जाणार आहे. (Indian Navy Air Squadron 316 aircraft will be operational at INS Hansa)

आयएनएएस (INS) ३१६ बोईंग पी ८ आय आज जगातील सर्वात अत्याधुनिक बहु- भूमिका लांब पल्ल्याचे सागरी (Sea) शोध आणि पाणबुडी विरोधी युद्धात वापरले जाणारे (LRMR ASW) विमान म्हणून ओळखले जाते. हे विमान दुहेरी जेट इंजीनद्वारे चालवले जाते आणि ते हवेतून जहाजावर क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडोने सुसज्ज मारा करू शकते. भारतीय नौदलाने २०१३ मध्ये पी-८ आय विमानांची पहिली तुकडी घेतली होती. जी आयएनएएस राजाली-अरकोनम येथे तैनात आहेत. आयएनएएस ३१६, भारतीय नौदलाच्या (Indian Navy) चिलखताला आयओआरमध्ये राष्ट्राला कोणताही धोका निर्माण करण्यासाठी, ते शोधून काढण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी, चार अतिरिक्त विमानांची (flight) दुसरी तुकडी चालवते.

नवीन एअर स्क्वाड्रनचे नेतृत्व सीडीआर अमित महापात्रा यांच्याकडे असेल, जो विस्तृत ऑपरेशनल अनुभवासह एक कुशल बोईंग पी ८ आय पायलट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT