Yatch Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: उत्‍सुकता वाढली! 'इफ्‍फी'त होणार तरंगणाऱ्या ‘यॉट’वर विशेष कार्यक्रम

Goa IFFI 2024: इफ्फीच्‍या काळात संघटना यॉटवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. त्यात मास्टर क्लासेस आणि तज्‍ज्ञांचे सत्र, चित्रपट निर्मिती, उत्पादन आणि कथा सांगणाऱ्या अनुभवी तज्‍ज्ञांच्‍या सत्रांचा समावेश असेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa IFFI 2024 Yatch Program

पणजी: इफ्‍फीच्‍या काळात मांडवी नदीत वाऱ्यावर डोलणारी, पाण्यावर तरंगणारी यॉट खास आकर्षण ठरणार आहे. भारतीय चलतचित्र निर्माता संघटनेने अशी यॉट इफ्फीसाठी गोव्यात आणण्याचे ठरविले आहे. या संघटनेचे २५ हजार सदस्य आहेत.

इफ्फीच्‍या काळात सदर संघटना यॉटवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. त्यात मास्टर क्लासेस आणि तज्‍ज्ञांचे सत्र, चित्रपट निर्मिती, उत्पादन आणि कथा सांगणाऱ्या अनुभवी तज्‍ज्ञांच्‍या सत्रांचा समावेश असेल, ज्यामुळे नवोदित आणि अनुभवी प्रतिभेला सखोल ज्ञान मिळेल, असे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेचे अध्यक्ष अभय सिन्हा यांनी दिल्लीत याची घोषणा केली. संघटनेचे वरिष्ठ सदस्य बॉबी बेदी, निशांत उज्ज्वल, सुषमा शिरोमणी, अतुल पटेल, टीनू वर्मा आणि युसुफ शेख यांच्या प्रयत्नाने यॉटवर सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्याची संकल्पना प्रत्यक्षात येत आहे.

भारतीय चित्रपट संघटना किंवा कंपनीतर्फे यापूर्वी कधीही असा उपक्रम आयोजित करण्‍यात आलेला नाही. या उपक्रमामुळे इफ्फीला उपस्थित सर्व प्रतिनिधी व निर्माता सदस्यांना ‘कान्स’ चित्रपट महोत्सवासारखे एक विशेष व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यॉट मांडवी नदीत ‘मेरियॉट’ हॉटेलसमोर पार्क केली जाईल.

‘यॉट’चे २१ नोव्हेंबरला होणार उद्‌घाटन

सिनेनिर्माते, उद्योग व्यावसायिक आणि माध्यम प्रतिनिधींसाठी एक अद्वितीय व जल्लोषमय ठिकाण म्हणून ही यॉट विकसित केली जाणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उद्‌घाटन समारंभासह मास्टर क्लासेस, फिल्म लाँच, कलाकार आणि तज्‍ज्ञांचा सत्कार यासह कार्यक्रमांची मालिकाच हाेणार आहे.

फिल्म लाँचेस आणि ट्रेलर इव्हेंट्स

यॉटवर नव्या चित्रपटांचे आणि ट्रेलरचे प्रिमिअर इव्हेंट आयोजित केले जातील, ज्यामुळे चित्रपट निर्मात्यांना, उद्योगातील प्रमुखांना त्यांचे प्रकल्प सादर करता येतील. यॉटवर विशेषतः सरकारी अधिकारी, सेलिब्रिटी आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या मुलाखती आणि पत्रकार परिषदांसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

Goa Cabinet: मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच? मुख्यमंत्री सावंत म्हणाले की पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच....

Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य

Goa Trip: तर आता कन्फर्म कराच!! डिसेंबर जवळ आलाय; गोव्याला फिरायला जायचं आहे ना?

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

SCROLL FOR NEXT