Chancellor of Nehru University Prof. Shantishri Pandit  Dainik Gomantak
गोवा

Culture of India : भारतीय संस्कृती समानतेवर आधारित; नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री यांचे मत

Culture of India : गोवा विद्यापीठात सर्वाधिक ६२ टक्के गोव्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. गोव्याचे अनुकरण देशाने करणे गरजेचे आहे, असे प्रो. हरिलाल मेनन सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Culture of India :

पणजी, भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून स्त्रीला समानतेची वागणूक देण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीत तिला दुर्गा स्वरूपात पुजले आहे.

भारतीय संस्कृती ही समानतेवर आधारित असल्याचे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शांतीश्री पंडित यांनी केले.

विद्याप्रबोधिनी महाविद्यालय, उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृती भवन, पाटो येथे आयोजित लिंग समभाव हक्क संवादातून समन्वयाच्या ‘आशयाचा शोध आणि बोध’ याविषयावर आधारित संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, गोवा राज्य महिला आयोग्याच्या अध्यक्ष रंजिता पै, प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष संजल वालावलकर, प्राचार्य भूषण भावे, उपप्राचार्य अनिल ठोसरे, समन्वयक प्रा. केदारनाथ तडकोड उपस्थित होते.

गोवा विद्यापीठात सर्वाधिक ६२ टक्के गोव्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. गोव्याचे अनुकरण देशाने करणे गरजेचे आहे, असे प्रो. हरिलाल मेनन सांगितले.

पंचसूत्रीवर भर द्या

लिंगभेद विरहित महिलांना समानता देणे हे सामाजिक सुधारणेचा एक घटक आहे. त्यामुळे शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य, आत्मसन्मान तसेच लिंग समानता या पंचसूत्रीवर अधिक भर देत कार्य करणे गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ. भूषण भावे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT