Content Creators Fair Goa
पणजी: सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कमाईचा एक नवीन मार्ग उदयास आला आहे. देशातील हजारो तरुण कंटेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कमाई करत आहेत.
दरम्यान, कंटेंट क्रिएटर्संना याबाबत अधिक शिक्षित होण्याची गरज आहे. या शिक्षणासाठी गोव्यात कंटेंट क्रिएटर्सचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला थाला फॉर ऱिझन भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संबोधित करत, नवीन कंटेंट क्रिएटर्सना पैसे कमावण्याचा कानमंत्र दिला.
रिगीचे सह-संस्थापक स्वप्नील सौरव आणि अनन्या सिंघल यांनी या अनोख्या उपक्रमाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. रिगी प्रभाव 2024 (Rigi Prabhav 2024) इव्हेंटचा उद्देश कंटेंट क्रिएटर्सना प्लॅटफॉर्मशी संबंधित नवीन तंत्रज्ञान आणि साधनांबद्दल माहिती करुन देणे हा होता.
आपले अनुभव आणि टिप्स शेअर करताना धोनी म्हणाला की, या क्षेत्रात कंटेंट क्रिएटर्सचे महत्त्व सतत वाढत आहे आणि योग्य मार्गदर्शनाने ते अधिक चांगल्या प्रकारे कमाई करू शकतात.
सह-संस्थापक स्वप्नील सौरव आणि अनन्या सिंघल म्हणाले की रिगीने आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन वैशिष्ट्ये लाँच केली आहेत जी कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या Community चे व्यवस्थापन करण्यास मदत करतील.
यामध्ये सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट, सशुल्क वर्कशॉप्स, लाइव्ह क्लासेस, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मसह विविध साधनांचा समावेश आहे. क्रिएटर्स आता त्यांचा अभ्यासक्रम, वेबिनार आणि समुदाय सुरू करण्यासाठी देखील वापरू शकतात.
रिगी कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या Community ची कमाई करण्यासाठी पर्याय देते, सध्या देशात आणि परदेशात वेगाने वाढत आहे. अलीकडेच, रिगीने 100 कोटींहून अधिक निधी उभारला आहे. यात महेंद्रसिंह धोनीसह अनेक मोठे गुंतवणूकदार जोडले गेले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.