Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: भारतीय शरीरसौष्ठव संघाची निवड चाचणी मडगावात, गोमंतकीय खेळाडूंना संधी

आयोजन समितीच्या चेअरमनपदी योगीराज कामत व अध्यक्षपदी प्रभव नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News भारताचे शरीरसौष्ठव संघ 5 ते 9 जुलै 2023 दरम्यान होणाऱ्या 13 व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव व फिजिक 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या 55 व्या आशियाई शरीरसौष्ठव (नेपाळ) व फिजिक तसेच 6 ते 12 नोव्हेंबर दरम्यान सेऊल येथील चौथ्या जागतिक शरीरसौष्ठव व फिजिक क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे.

या तिनही प्रतिष्ठेच्या व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताच्या संघातील खेळाडू निवडण्यासाठीची निवड चाचणी स्पर्धा नावेली मडगाव येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये 3 व 4 जून 2023 असे दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे.

ही माहिती या निवड चाचणी स्पर्धेसाठी निवडलेल्या आयोजन समितीचे मुख्य आश्रयदाता मडगावचे आमदार दिगंबर कामत यानी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परीषदेत सांगितले. 

आयोजन समितीच्या चेअरमनपदी योगीराज कामत व अध्यक्षपदी प्रभव नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

या पत्रकार परीषदेत भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सेक्रेटरी जनरल चेतन पाठारे, सरचिटणीस कुमारी हिरल शेठ तसेच गोव्याच्या शरीरसौष्ठव असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय रायकर, खजिनदार खुशाली विर्डिकर व गोव्याचे नामवंत शरीरसौष्ठवपटू उपस्थित होते.

या निवड चाचणी स्पर्धेत देशभरातील आघाडीचे 300 खेळाडू उपस्थित राहतील. गोव्यातील पाच ते सहा खेळाडूंचाही समावेश आहे.

गोमंतकीय खेळाडूंची निवड निवडचाचणी द्वारे केली जाईल असे चेतन पाठारे यानी सांगितले. दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी 30 आशियाई स्पर्धेसाठी 60 व जागतिक स्पर्धेतील 50 प्रकारांतील स्पर्धांसाठी 80 खेळाडूंची निवड केली जाईल असे पाठारे यानी सांगितले. 

 भारताने जागतिक शरीरसौष्ठव क्रिडा स्पर्धांमध्ये चांगली प्रगती केली असुन जास्तित जास्त पदके जिंकण्याचा विश्र्वास आम्हाला असल्याचे पाठारे यानी सांगितले.

भारतीय शरीरसौष्ठ महासंघाच्या देशभरात 44 शरीरसौष्ठव शाखा  असुन 5000 खेळाडूंची नोंदणी आहे असे ते म्हणाले. 

मिस्टर एशिया 2022 चे मानकरी यतिंदर सिंग, मिस्टर युनिव्हर्स 2022 चे मानकरी आर कार्तिकेश्र्वर सुद्धा निवड चाचणीत सहभागी होतील.

तसेच मडगावमधील निवड चाचणी स्पर्धेच्या वेळी पद्मश्री व अर्जुुन पुरस्काराने सन्मानित प्रेमचंद डेग्रा, अर्जुन पुरस्कार विजेते टी. व्ही पोवली यांचीही उपस्थिती असेल असे हिरल शेठ हिने सांगितले.

अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे गोव्यात पर्यटन क्षेत्राला फायदा होतो असे मत दिगंबर कामत यानी या प्रसंगी व्यक्त केले. या प्रसंगी शरीरसौष्ठ महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पोस्टरचेही अनावरण करण्यात आले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT