rohan  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: ''ब्रिटन - भारत ई-व्हिसा समस्या लवकरच सुटेल''

युके - भारत ई-व्हिसा समस्येवर मार्ग निघेल - पर्यटनमंत्री रोहन खंवटे

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात पर्यटन हंगाम सुरु झाला असून देश - विदेशातील पर्यटक गोव्याकडे वळत आहेत. गोव्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला असला तरी यूकेच्या पर्यटकांना ई-व्हिसा समस्येमुळे इच्छा असुन ही गोव्यात येता आलेले नाही. याचा परिणाम म्हणून यूकेमधून चार चार्टर्ड विमाने गोव्यात पोहोचण्याऐवजी आत्तापर्यंत केवळ एकच चार्टर्ड विमान पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही समस्या लवकरच सुटेल असे म्हटले आहे.

(India & UK E-Visa's problem will be resolved under the new Indian Origin PM Rishi Sunak)

याबाबत बोलताना मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासुन युके आणि भारत यांच्यातील ई-व्हिसा समस्या सुरु असून, यामुळे दोन्ही देशांमधील पर्यटन आणि संबंधित व्यवसायांवर वाईट परिणाम होत आहे. या समस्येचे लवकरच निराकारण होईल, असा विश्वास मंत्री खंवटे यांनी व्यक्त केला आहे. ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक हे यात महत्त्वाची भुमिका बजावतील असे ते म्हणाले. सुनक या प्रश्नाकडे सकारात्मक पाहतील असे ही ते म्हणाले.

काय आहे नेमके प्रकरणं ?

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांना देण्यात येणारी ई-व्हिसा पद्धत बंद आहे. व्हिसा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष व्हिसा घेण्याची सक्ती केल्याने भारतात येणाऱ्या ब्रिटीश पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. साहजिकच त्याचा विपरित परिणाम गोव्यातील हॉटेल्स व इतर पर्यटन उद्योगावर झाला आहे.

यापूर्वी ज्या पर्यटकांनी आपली गोव्याची सफर बुक केली होती, त्यांनी फटाफट बुकिंग रद्द करणे सुरू केल्याने प्रत्येक दिवशी एजन्सीकडे सात ते आठ बुकिंग रद्द केली जात आहेत. मागची तीन वर्षे कोविडमूळे गोव्यातील पर्यटन उद्योगावर याचा मोठा परिणाम होत आहे. यातच ई-व्हिसा पद्धत बंदचा गोवा पर्यटनाला ही मोठा फटका बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT