Canacona Lokotsav Dainik Gomantak
गोवा

Canacona Lokotsav: काणकोण लोकोत्सवाला राष्ट्रपती राहणार गैरहजर; सभापती तवडकरांनी सांगितले 'हे' कारण

''दोन महत्त्वाच्या व्यक्ती एकाच वेळी गोव्यात येणे शक्य नाही''

दैनिक गोमंतक

काणकोण ‘लोकोत्सव 2022’ सोहळा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. असे असताना या लोकोत्सवाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहू शकणार नाहीत अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे.

(India PM Modi will attending Lokotsav at Canacona)

काणकोण लोकोत्सवाबाबत माहिती देताना सभापती तवडकर म्हणाले की, हा लोकोत्सव 7 ते 11 डिसेंबर या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. दोन महत्त्वाच्या व्यक्ती एकाच वेळी गोव्यात येणे शक्य नाही. म्हणून राजशिष्टाचाराचे पालन करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहू शकणार नाहीत असे म्हटले आहे. अवघ्या एक दिवसावर लोकोत्सव आला असताना ऐनवेळी हा बदल केला गेला आहे. त्यामुळे लोकोत्सवात सहभागी होणाऱ्यांमध्ये संमिश्र भावना व्यक्त होत आहेत.

दोन लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता

याबाबत माहिती देताना तवडकर म्हणाले की, ‘लोकोत्सव 2022’ या सोहळ्याला दोन लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच या लोकोत्सवात देशभरातील नागरिक सहभागी होणार असल्याने गोव्याची संस्कृती या निमित्ताने देशभर पोहोचेल असे ही तवडकर यांनी म्हटले आहे.

गोव्यातील लोकोत्सव हा केवळ फेस्टीव्हल नाहीत तर तो एक विचार आहे. या विचारांना बळकटी देण्याचे काम गोवा सरकार करत आहे. गोव्यातील सामान्य नागरीकांना प्रमाण मानत विकास साधला जाणार आहे. त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून लोकोत्सवासारखे कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे तवडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT