Goa Dainik Gomantak
गोवा

India Pakistan War: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मार्गदर्शक तत्वे जाहीर

Goa Citizens: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात नागरी संरक्षण यंत्रणांनी आपत्कालीन तयारीसाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Sameer Amunekar

पणजी: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात नागरी संरक्षण यंत्रणांनी आपत्कालीन तयारीसाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. संभाव्य हवाई हल्ला परिस्थितीत ब्लॅकआउट प्रोटोकॉल, वाहतूक मर्यादा आणि आपत्कालीन प्रक्रिया कठोरपणे राबवण्यात यावी यासाठी नागरी संरक्षण विभागाने या संदर्भात नागरिक, वाहतूक सेवा, आपत्कालीन केंद्रे आणि सार्वजनिक संस्थांसाठी विशेष मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

राज्याच्या नागरी संरक्षण विभागाने याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. कोणतीही आपत्कालीन सूचना आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता खालील प्रमाणे धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे.

हवाई हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशभर एकसमान सायरन प्रणाली लागू करण्यात आली आहे, जी आता गोव्यातही प्रभावीपणे राबवली जाईल. 'अॅक्शन वॉर्निंग रेड' हा दोन मिनिटे सलग वाजणारा सायरन हवाई हल्ल्याचा इशारा देतो. यानंतर वाजणारा 'रेडर्सपास' सायरन जो सतत दोन मिनिटे वाजतो धोका संपल्याचे संकेत देईल.

अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी सरकारी आश्रयस्थानांमध्ये स्थलांतर करावे किंवा खिडक्या बंद करून घरात राहावं. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणं अत्यावश्यक आहे. तसंच, टेलिफोन वा इंटरनेटचा अनावश्यक वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवाई हल्ला इशाऱ्यानंतर सर्व सार्वजनिक आणि खासगी जागांतील दिवे तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच खिडक्या, दरवाजा बंद करण्या यावं.

सर्व वाहने जवळच्या सुरक्षित थांब्यावर किंवा स्टेशनवर पार्क करावीत. प्रत्येक खाजगी वाहनचालकानं वाहनाचे सर्व लाईट बंद करून ते सुरक्षित ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पार्क करावे. अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा, असं सांगण्यात आलं आहे.

सर्व आपत्कालीन ऑपरेशन सेंटर्संना बॅकअप पॉवर, रेडिओ कम्युनिकेशन, सॅटेलाइट फोन, आणि हिंगड प्रकाशयोजनेसह पूर्ण सज्ज ठेवण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन, लष्करी कमांड व शेजारील जिल्ह्यांतील EOCS यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवण्याचे आदेश आहेत.

ऑल क्लीअर किंवा हिरवा सिग्नल अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच नियमितपणे सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT